बाळासाहेबांवर पोवाडा

२३ जानेवारी २०२१रोजी मी लिहिलेला पोवाडा

 बाळासायबांचं नाव लई थोर.....

बाळा सायबांचं नाव लई थोर, केला घनघोर, नेता तो थोर, संघर्ष मराठी माणसाचा
संघर्ष मराठी माणसाचा
केला त्यांनी न्याय समाजाचा हा जी जी जी ।।

मुंबई ही मराठ्यांची शान, नको तिथं घाण, मारला बाण, 
टाकला घाव वर्मा वरती
टाकला घाव वर्मा वरती
दाविली मराठ्यांची मग शान जी जी जी ।।

मार्मिक मांडती शब्द, चित्रातून व्यंग, लेखणीत दंग, 
दावी पडसाद समाजाचा
दावी पडसाद समाजाचा
मारी फटकारेही नेत्यांना हा जी जी जी।।

©प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक
 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान