पोस्ट्स

आठवणींना उजाळा- १. रेशन दुकान लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आठवणींना उजाळा- १. रेशन दुकान

        खूप दिवसांनी लोक रांगेत उभे राहून सामान खरेदी करताना पाहीले.. खरंतर मुंबई सारख्या ठिकाणी किराणा माल आणि तोही रांगते हा प्रकार मला अजब वाटला, पण मुंबईतल्या गरीब लोकांसाठी टेंपोंधून धान्य आणून देण्याची ही पद्धत पूर्वापार आहे म्हणे.. काहीही असो, पण मला जुन्या दिवसांची आठवण झाली.. मी लहान असताना आमच्या घरी रेशनकार्डावरचं रॉकेल आणि साखर आणली जायची. आमच्याकडे मी जवळपास चवथीत जाईपर्यंत म्हणजे १९९२ पर्यंत गॅसची शेगडी नव्हती, आमच्या घरचा स्वयंपाक आई स्टोव्ह आणि वातीचा स्टोव्ह यांच्या मदतीनं करायची. पण आईच्या हातालाच अशी चव की सारी दुनियाच तिला सुगरण म्हणत असे, कारण ती जे करते ते उत्तमच बनते ही तिची म्हणजे खऱ्या सुगरणीची खासियत आहे.. असो, मुद्दा असा की मी जशी मोठी होऊ लागले तसं, मलापण आईशिवाय रेशनच्या दुकानात जाण्याची वेळ येऊ लागली, मी पाचवीत असतानापासून हातात रॉकेलचा डबा घेऊन आई रांगेत उभं राहायला सांगायची. रॉकेल आणि साखर आणण्यासाठी रेशनच्या दुकानात आवश्यक असणाऱ्या सर्व टप्प्यांबद्दली माहिती आईनं मला दिलेली असायची.. आणि रेशनच्या दुकानातल्या काकांनाही ही एकट...