सरकार आता तरी जागं होणार आहेय का?
(२००९ साली स्टार माझात असताना लिहिलेला हा मजकूर आहे, मी तो ब्लॉगवर टाकलाच नव्हता, पण आजही तो तंतोतंत लागू पडतोय..) 3/8/2011 सालातला हा ब्लॉग आहे, यामध्ये ताजवरील दहशतवादी हल्ल्यानंतरचा संदर्भ आणि राजकीय स्थितीवर भाष्य केलं होतं.. सरकार आता तरी जागं होणार आहे का? नाही-हो नाही-हो म्हणत एकदाचा राम प्रधान समितीच्या ६०० पानी अहवालाचा १०० पानी सारांश विधीमंडळात सादर झाला. मात्र यापूर्वीच माध्यमांनी म्हंटल्याप्रमाणे पोलीस आणि प्रशासनातल्या समन्वयाचा आभावच या अहवालाच्या रुपानं पुन्हा समोर आलाय. मुळात 'मुंबईवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो', हा इशारेवजा संदेश मुंबई पोलिसांना मिळाला होता, मात्र त्याचा योग्य तो अर्थ लावण्यात पोलिस आणि प्रशासन अपयशी ठरलं. आणि हे आता उघडच आहे. मात्र या अहवालाच्या माध्यमातून पुन्हा एक गोष्ट प्रामुख्यानं समोर येतेय आणि ती म्हणजे आपल्या पोलीस दलात एके ४७शी आणि दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी पुरेसा पोलीस ताफा तर नाहीचे पण शस्त्रास्त्रंही अत्यंत अपुरी आहेत. आपल्या पोलीस दलात अत्याधुनिक शस्त्...