निवडुंगाचं फुल
निवडुंगाचं फुल
आई होती तुझी निवडुंगाचं फुल
काटेकुटे असूनही निराळी तिची झूल
ओलावा नसतानाच वाढली काट्यांमध्ये
पण देवजाणे कोठून शिकली ओलावा देणे
तिला वाटले काट्यांनाही कधीतरी फुटेल पाझर
पण काटेच ते, टोचणारच, त्यांना कसली कदर
कळी असताना एकटी एकटी कित्तीदा ती रडली
पण निवडुंगाच्या एकाही पानाने दखल नाही घेतली
एक दिवस मात्र, ते रडू देवानेच पुसले
अलगद आपल्या झोळीत घेऊन एका झऱ्यात सोडले
झऱ्याने मग कळीला छान छान खेळवले
फुल उमलेपर्यंत आपल्या कुशीतच वाढवले
कळीचे फुल होताना मग अनेकांना वाटले नवल
निवडुंगाचीही फुले बहरतात हाच त्यांच्यासाठी कहर
फुलानेही वाटेतील काटे बाजूलाच सारले
मूळ असलं काटेरी तरी ऊब देणे नाही सोडले
काट्यांकडे मागे वळून फुलाने नाही पाहिलं
काट्यांशिवाय जगणं खरं, हे तिनं ताडलं
फुलाला मग एक दिवस भेटला राजकुमार
'गंध'वार्ताही न घेता गुंफुन घेतला हार
राजकुमराने फुलासाठी सोडले घर दार
फुलानेही राजकुमारासाठी घेतली मेहनत अपार
फुलाने मग राजकुमाराला दिला छोटा राजकुमार
आनंदाने बहरून गेला साराच दरबार
फुलासाठी राजकुमार झटला अपार
पण फुल कोमेजू लागले, त्याला सोसवेना भार
अशी होती आई तुझी निवडुंगाचं फुल
काट्यातूनही माया देणारं जगन्नियंत्याचं मूल
© प्रज्ञा कुलकर्णी हस्तक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा