'त्यांचं' भावविश्व..

आजींनी मला असं काही सांगावं हे पूर्णपण अनपेक्षितच. पण त्यांनी बोलताबोलता त्यांच्या नातेवाईकांच्या फोनची यादीच माझ्या हातात ठेवली,म्हणाल्या,'हे काही जवळचे नातेवाईक आहेत, मला काही झालंच तर यांना फोन कर...' काही क्षण मी काहीच बोलू शकले नाही.. मला खूप वाईट वाटलं, पण वस्तूस्थितीचं भान माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त असल्याचं मला जाणवलं. आजी एकट्याच राहतात. त्यांचे नातेवाईक बरेच आहेत, पण ते आपापल्या कामात व्यग्र! ह्या आजींचं वय साधारण 77-78 असेल. पण त्या कायम म्हणतात "आम्ही म्हातारी माणसं म्हणजे, 'असून अडचण नसून खोळंबा', त्यांच्या वाक्यानं वाईट वाटलं, पण हे खरय.. ही वस्तूस्थितीच आहे. मुलगा आणि सुनेला कुठेतरी बाहेर जायचंय आणि मुलांना बरोबर न्यायचं नाहिये, अशा वेळी मुलांना सांभाळायला घरात आजी-आजोबा हक्कानं घरात असावेत असा आदेश असतो, तर जेंव्हा घरी कुणीतरी पाहुणे येणार असतात अशा वेळी घरात म्हातारी माणसं अडचण वाटूलागतात. हे कटू सत्य आज अनेक घरांत आपल्याला पाहायला मिळतंय. यावर उपाय किंवा त्याला पर्याय म्हणून आपण पाहतो वृद्धाश्रमांकडे. सध्या ज्या धावत्या जगात आपण वावरतोय ...