लेखणीत त्यांच्या तळपती तलवार।

 बाबासाहेब पुरंदरे गेले तेंव्हा २५ नोव्हेंबर २०२१ रोजी रचलेल्या  ओळी


लेखणीत त्यांच्या तळपती तलवार।
जणू शिवराज्याचा लख्ख दिसे दरबार।।


ना अवडंबर ना लटिका तो देखावा।
हे राज्य शिवाचे व्हावे, असा उमाळा।।


किती गड-किल्ल्यांना पादाक्रांतही केले।
मग माझ्या शिवबाचे सुंदर चरित्र रचिले।।


लखलखत्या इतिहासाला देती उजाळा।
तव पदी लीन म्हणे, दावी आम्हा जीव्हाळा।।


योध्याच्या वीरत्वाची दावी धार।
शिवचरित्र बनते सामान्यांची ढाल।।


तव जाणयाने मग कित्येक भिजल्या नजरा।
आज लीन तुम्ही त्या राजा चरणी, सांगावा आमुचा मुजरा।।
©प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान