१० मुद्दे
ऐकण्या-बोलण्या संबंधी १० मुद्दे लक्षात घ्या- जग जिंकाल!
श्रवण हा सर्वात उत्तम गुण आहे, त्यामुळे कमी बोला आणि जास्त ऐकाबोलताना विचार करून बोला, बोलून विचारात पडू नका
फक्त फायदा आहे अशांशीच बोलू नका, सर्वांशी संवाद ठेवा
कुणालाच कमी लेखू नका, तुम्हाला कोण, कधी, कसा कामी येईल सांगता येत नाही
पण म्हणून विनाकारण कुणाशीही गप्पा छाटत बसू नका
जन्माला आलेला प्रत्येकजण ईश्वराच्या इच्छेनेच जन्मलाय, आपल्याला कुणाला कमी लेखण्याचा अधिकार नाही. हे ध्यानात असू द्या
पण एखादी व्यक्ती तुमच्याशी नीट वागत नाही म्हणून तुम्हीह त्यांच्याशी तसंच वागू नका. अन्यथा तुम्ही व ती व्यक्ती एकाच तराजूत मोजले जाल
व्यर्थ बडबडण्यात वेळ फुकट घालवू नका
शक्यतो कामाचे व मोजकेच बोला
वर्तन असं ठेवा जे लहानांपासून थोरांना आदर्शवत वाटेल
विनाकारण इकडचा राग तिकडे काढू नका
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा