अटल बिहारी वाजपेयी १६ ऑगस्ट २०१८ रोजीची कविता



अटल शब्द अन् अटल बुद्धीचा
खजिना होता व्यासंगाचा
देश कार्य अन् जन कल्याणा
झिजवल्यास तू आपुल्या वहाणा

गर्व कशाचा, प्रौढी कसली
अढळ राही तव अटलशी मूर्ती

कधी मनोहर, कधी खोलवर
कधी पुराणा रमसी कवीवर
कधी अध्यात्मा, कधी समाजा
कधी बोधाने प्रेरीत करिसी

जनउद्धारा तव अती प्रिती
स्वयंस्फूर्तीने पाही जन रिती
वाङनिश्चया तू नाकारसी
देशप्रेम वधू तू स्वीकारसी

वक्ता म्हणूनी ते नामांकित
लेखन तुमचे करते पुलकित
कवित्व तुमचे स्फूर्तीदायक
सरस्वतीचा तुम्हा आशीर्वच!
राजकीय पटलावर वावर
अनेक मित्र अन् शत्रू टिचभर
राजा म्हणूनी मुकुट शिरावर
मिरवी तेंव्हा अससी स्थिरचर

ब्रह्मचारी परी कर्म पुजारी
असा जीवात्मा होणे नाही
असा जीवात्मा होणे नाही
असा जीवात्मा होणे नाही
©प्रज्ञा कुलकर्णी- हस्तक





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान