पोस्ट्स

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान

मी कधीच 'अ' तुकडीत न्हवते, आणि त्याचा मला सार्थ अभिमानही आहे..!! पहिली ते चवथी 'म.के. अठवले' शाळेत मी 'क' तुकडीत आणि नंतर सिटी हायस्कूलमध्ये गेल्यावर मला 'ड' :P तुकडी मिळाली होती. अर्थात मार्कांवर आधारित फक्त एकच तुकडी होती आणि ती फक्त चवथीच्या मार्कांवर आधारित होती त्यामुळे साले 'अ' ला जे चिकटले ते चिकटलेच लेकाचे.. अर्थात मला त्यांचा हेवा वगैरे कधीच वाटायचा नाही, उलट त्या वर्गातल्या ढ मुलांचीच फार कीव यायची.. कारण अ तुकडीला शिकवणारे सर्वच 'मास्तर' हि मुलं हुशारच आहेत असा (आ)ग्रह ठेवून शिकवत असत. असो. त्यांचं दुःख त्यांच्यापाशी.. त्यातच एकाच वर्षासाठी मला पुण्यातल्या शाळेत जायला मिळालं ती म्हणजे 'रेणुका स्वरुप'.. ती शाळा मला खरंचच खूप आवडली.. फक्त गाणं की खेळ या माझ्या कन्फ्युजनला घाणेकर बाईंनी फुल स्टॉप देत भरड्या आवाजात सांगितलं.. " काही खेळाबिळात जाऊ नको तुझा आवाज चांगलाय इकडेच येत जा प्रॅक्टिसला.." तेंव्हा मी बऱ्यापैकी गुणी म्हणजे थोडक्यात नंदिबैल असल्यानं मला नेमकं काय आवडतं हे कळलंच नाही.. अर्थात हे मी ११वीत जाईपर्...