पुलकित

पु.ल. पुष्कळ आणि लय भारी, म्हणजे #पु.ल.देशपांडे. इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करायचं तरी काय? म्हणजे त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, उंदरानं सिंहाच्या आयाळाच्या केसाची महती लोकांना सांगण्यासारखंच! उंदंड कार्यकर्तृत्वानं नटलेली अनेक व्यक्तिमत्व आपण पाहतो. पण पु.ल. देशपांडे सगळ्यालाच अपवाद. पुलंच्या अफाट कार्याच्या तुलनेत मी इथे जे नमूद केले ते, सागरातल्या थेंबा इतकेच आहे, याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. विनोदी लेखनात त्यांचा हातखंडा असला तरी, सिनेमा, नाटक, टीव्ही, रेडिओ ते ही एकवेळ ठिक, पण गायन, वादन, लेखन, विनोदी शैलीत प्रवास वर्णन, दर्जेदार भाषण, स्टँडअप कॉमेडी आणि प्रचंड दातृत्व , यापेक्षा मोठं काही असूच शकत नाही. त्यांच्या पुस्तकं, नाटक, प्रवासवर्णनांची यादी, त्यांचे काही व्हिडिओ आपल्याला इंटरनेटवर सहजी मिळतात. पण त्यांच्या दातृत्वाची फार चर्चा होत नाही. त्यांना मिळालेला सगळा पैसा ते दान करत असत. पत्नी सुनीता ठाकुर या देेखील पुरक सहचारिणी असल्याने त्यांनी पैसा साठवावा असा अट्टहास केला नाही. जीवन कसं जगावं याचं धाधांत उदाहरण म्हणजे पु.ल. दांपत्य. वरील फो...