पोस्ट्स

Brahma #world #earth #ब्रह्म #जग #पृथ्वी #sents #संत लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या

इमेज
  ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या वाचायला जड वाटणारे हे शब्द म्हणजे आयुष्याचं थोडक्यात सार आहेत. जगातील अंतिम सत्य काय आणि मिथ्या म्हणजे खोटं काय, हे या एका ओळीने स्पष्ट केलंय. जगाच्या निर्मितीचा शोध अजूनही लागतोच आहे, कारण जगाच्या निर्मितीला लागलेली लाखो वर्ष ही आपल्या माफक जग निर्मितीची झाली.पण आपल्याच जग किंवा पृथ्वी या संकल्पनेसारख्या असंख्य पृथ्वी, ग्रह, तारे, तारामंडले, इतकंच काय कित्येत लाखो कोट्यावधी आकाशगंगा देखिल अस्तित्वात आहेत. त्यामुळे आपण किती यत्किंचीत प्राणी आहोत याचा यावरूनच अंदाज पुरेसा आहे.  आता हे जे सांगितले ते ब्रह्माच्या व्याप्तिचे अगदीच तोकडे उदाहरण आहे. हे तोकडे का, कारण याचा सारांश अनेक संतांनी आपल्या उक्तींमधून दिलाय, त्यांना प्राप्त होणाऱ्या विश्वाच्या व्यप्तीचा उल्लेख संतांनी श्र्लोक, अभंग यातून सहजी केलेला आहे.  संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ म्हणतात- ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घडी । तो उच्छिष्टें काढी धर्माधरीं ॥१॥ म्हणजे, जो ब्रह्मांडांना उतरंड लावल्याप्रमाणे हवा तसा लावू शकतो, तो मात्र धर्मासाठी, चांगल्यासाठी लोकांची उष्टी काढण्यास लाज बाळगत नाही.. दे...