'उलीवूड' रोजगाराचा मार्ग!

उलीवूड ना स्वार्थ ना परमार्थ, हा तर रोजगाराचा नवा मार्ग मला तरी हे विधान मुळीच पटत नाही की 'तुम्ही बॉलिवुड यु.पी.ला हलवताय' उलटपक्षी या नव्या संकल्पनेमुळे, बॉलिवूड प्रमाणे उत्तरप्रदेशमध्ये उलीवूड तयार करण्याच्या प्रयत्नामुळे उ.प्र. मध्ये रोजगार वाढेल, आणि तो सर्व स्वरुपाचा असेल म्हणजे अगदी सुतार-लोहार-चांभार-शिंपी-न्हा वी आदी बारा बलुतेदारांपासून, बांधकाम, बागकाम, वास्तूविषारद, वाहतूक, केटरिंग अशा असंख्य क्षेत्रातील लोकांना रोजगार मिळेल. शिवाय, नवे लेखक, दिग्दर्शक, कलाकार, मॉडेल्सगी देशाला मिळतील, त्यांचीही रेलचेल वाढेल.... नव्यानं तयार होणारी इंडस्ट्री सर्वांसाठी खुली असेल त्यामुळे ऑप्शन्स वाढतील, नॅरो माइंड मेंटॅलिटी म्हणजेच संकुचित मनोवृत्तीला आळा बसेल, ती अगदी संपुष्टात येणार नाही पण कमी होईल नक्की. कारण अनेकांच्या हाताला काम मिळालेलं असेल. आणि अशा पद्धतीनं संपूर्ण भारतात ज्याप्रकारे प्रत्येक राज्याने आपली स्वतंत्रपणे विकसित केलेली इंडस्ट्री ही त्या त्या राज्यांच्या रोजगाराचा काही अंशी तरी भार नक्कीच उचलू शकेल. मग दरवेळी महाराष्ट्रातच सगळा भारत एकवटण्याची जी वेळ येते ती...