सावळ्याची सावळी

 




सावळ्या मनाला सावळीच साद दे

सावळ्या विठूला तू सुरांची गाज दे


सावळीच भावना अन् सावळाच तो विठू

माऊलीच्या विठ्ठलाला संत सावळ्याचा वेढू


सावळेच शब्द सारे, सावळीच रित ही

सावळ्याचे शब्द कानी, सावळी भावना मनी


सावळी ती गाय होई सावळ्याची वत्सला

सावळ्या भोळ्या जीवाची तीच सावळी कपिला


सावळ्याची बासरी तर भासवी स्वर सावळे

वृक्ष-वल्ली-धेनू-वारे गाती सूरही सावळे


सावळेच गान गाई, कधी गोड अन् कधी कटू

सावळीच भक्ती माझी सावळीच ही तुझी धिटू


सावळ्याची सावळी मी, आसमंतही सावळा 

सावळ्याने इष्ट केले, पुनित केले या जीवा

सावळीच शब्द माला, सावळ्या गळी चढो

सावळीच वर्णमाला सावळ्या चरणी वसो


©प्रज्ञा कुलकर्णी हस्तक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान