तू विचारतोस, यांनी काय केलं देशासाठी?
नुकत्याच संसदीय ठरवलेल्या राऊतांच्या शब्दात, चु ति या, तू विचारतोस, यांनी काय केलं देशासाठी?
कर्तव्य बजावताना त्यांनी झेलल्या गोळ्या आपल्यासाठी
कर्तव्य बजावताना त्यांनी झेलली आग आपल्यासाठी
कर्तव्य बजावताना त्यांनी झेलला बर्फ आपल्यासाठी
कर्तव्य बजावताना त्यांनी झेलला महापूर आपल्यासाठी
कर्तव्य बजावताना त्यांनी झेलला कर्दनकाळ बनून आलेला पाऊस आपल्यासाठी
कर्तव्य बजावताना ते अक्षरशः होरपळले गेले आपल्यासाठी
आणि नुकत्याच संसदीय ठरवलेल्या राऊतांच्या शब्दात, चु ति या, तू विचारतोस, यांनी काय केलं देशासाठी?
जेंव्हा एखाद्या हॉटेलमधून फिंगरबाउलमधले हात पुसत बाहेर पडतोस, तेंव्हा तुझी तीच बोटं शाबूत राहावीत म्हणून तो उभा असतो सीमोवर तुझ्यासाठी
नाइन्टी, व्हिस्की,रम, वोडका मारून मध्यरात्रीसुद्धा तुझ्या केसाला धक्का न लागता तू घरी पोहोचतोस, कारण तोच उभा असतो रक्षणासाठी
एखाद्या ललनेसोबत रासक्रीडाकरून, जरी घरी तोंडलपवत गेलास, तरी तो छाताडावर गोळ्या झेलतोय तुझ्यासाठी
आणि आणि नुकत्याच संसदीय ठरवलेल्या राऊतांच्या शब्दात, चु ति या, तू विचारतोस, यांनी काय केलं देशासाठी?
टिंगार वर करून गावभर हिंडतोस तेंव्हा तुला माहिती असतं तू सुरक्षित आहेस, कारण तो उभाय सीमेवर आपल्यासाठी
तू घरात नसलास, रात्रपाळीवर जरी गेलास, तरी तुझं मूल सुरक्षित झोपलंय, कारण तो सैनिक शत्रूवर नजर ठेऊन आहे आपल्यासाठी
मित्रांच्या गराड्यात कधी झुरके हवेत तर कधी पचापच थुंकतोयस, तरीही तो उभा आहेच तुझ्या रक्षणासाठी
बऱ्याच उचापात्या करून तुझा थकलेला देह तू फेकलायस बिछान्यावर, कारण त्यानेच स्वीकारलीय जबाबदारी रक्षणाची तुझ्यासाठी
आणि आणि नुकत्याच संसदीय ठरवलेल्या राऊतांच्या शब्दात, चु ति या, तू विचारतोस, यांनी काय केलं देशासाठी?
एकमेकाची कॉलर पकडून शिव्या घालत थोबाड फोडायची भाषा करतोयस, कारण तो उभाय, आपल्या रक्षणासाठी
पोरींकडे वाकड्या नजरेनं बघत, कधी शिट्टी मारत तिची छेड काढत लई मजा घेतोयस, कारण तो उभाय सीमेवर तुझ्या रक्षणासाठी
कधी घरच्या वादात, कधी रागात, तर कधी एखाद्या पक्षासाठी भांडभांड भांडतोयस, कारण तो उभाय, तुझं भांडणारं थोबाड शाबुत ठेवायसाठी
कधी समुद्रमार्गे कधी अवकाशातून कधी जमिनीवरूनच मारा झाला तरी तुझ्या केसाला धक्का लागत नाही कारण, तो लढतोय तुझ्यामाझ्यासाठी
आणि नुकत्याच संसदीय ठरवलेल्या राऊतांच्या शब्दात, चु ति या, तू विचारतोस, यांनी काय केलं देशासाठी?
©प्रज्ञा कुलकर्णी हस्तक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा