नव्या संसद इमारतीची माहिती थोडक्यात

#CentralVista #संसदेचीनवीइमारत संसदेची नवी इमारत त्रिकोणाकृती आहे. नवी इमारत चार मजली आहे. टाटा प्रोजेक्टस् लिमिटेड मार्फत इमारत बांधली आहे. एचसीपी डिझाईन आणि प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा.लि. ने डिझाइन केले आहे. लोकसभा खासदारांसाठी 888 आणि राज्यसभा खासदारांसाठी 384 आसन व्यवस्था करण्यात आलीय. पार्लमेंट हॉलमध्ये एकूण 1 हजार 224 सदस्य एकाच वेळी बसू शकतील अशी क्षमता आहे. भविष्यात दोन्ही सभागृहांची वाढीव संख्या लक्षात घेत ही व्यवस्था केलेली आहे. नव्या संसद इमारत आणि परिसराचं क्षेत्रफळ 64 हजार 500 चौरस मीटर आहे. 16 हजार 921 चौ.मी. अंडरगाऊंड. बांधकामाचा खर्च ९५०कोटींहून वाढून १२०० कोटींपर्यंत गेला, असं सांगतात. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग ही संसदेची नवीन इमारत बांधण्यासाठीची नोडल एजन्सी आहे. भारताचा लोकशाही वारसा सांगणारं ‘संविधान सभागृह’ इथे आहे. संसद सदस्यासाठी लाऊंज सभागृह, ग्रंथालय, अनेक समित्यांच्या खोल्या, भोजनगृह इथे आहे.