चालचलन

 


 
अनेकांची ओळख त्यांच्या चालीनेच होते
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण चालीसंदर्भात सुचवण्यासाठीच आली
१. चालणे हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार आणि यशस्वीतेचं गमक आहे
२. चालणे हे सरळमार्गी असावे, ज्यामुळे आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरी ती चाल डगमगत नाही
३. कोणतीही चाल ही आधी स्वतःच्या चांगल्यासाठी असावी
सोबतच आप्तेष्टांच्या, मित्र-मैत्रिणींच्या, जवळच्या व समाजाच्या  चांगल्यासाठीच आपली चाल असावी
४. सरळमार्गी लोक वाकड्या मार्गाने जातच नाहीत, असं म्हणतात, पण काहीजण मुद्दाम वाकड्यात शिरतात
५. आपली चाल वाकडी नसणं हीच खरी ओळख असावी
अनेक लोक चाल खेळतात, पण ती चाल शिवरायांप्रमाणे सर्वांच्या भल्याची असावी
६. बुद्धीबळात जशा चाली महत्वाच्या असतात, तशा आयुष्यातही चालींना विशेष महत्व आहे.
७. चालणे ही निरंतर प्रक्रिया आहे. चालण्यामुळेच चालना मिऴते
८. अविरत चालणे हे जिवंतपणाचे, उत्साहाचे, चैतन्याचे लक्षण आहे.
९. आपण वेगवेगळ्या चाली चालतो, पण सर्वांचा चालविता धनी एकच, हे विसरू नका
१०. कोणाच्याही वाईटासाठी खेळलेली किंवा केलेली 'चाल' कधीच यशस्वी होत नाही
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान