कष्टाळू माता

माझी आई नवदुर्गेची चौथी माळ 🙏😇 "प्रज्ञा जरा खोब्र खोऊन दे गं", असं म्हणून तिने माझ्या हाती काम सोपवलं. ते काम छोटंच होतं पण माझ्या छोट्याशा हातांना करवंट्या चांगल्याच टोचत होत्या पण तरी एखादं काम दिलं की ते नेटानं करायचं ही बहुदा आम्हा मेषवाल्यांची सवयच. आई असूनही तिने माझ्यात व भावात कधी भेदभाव केला नाही. दोघांना सर्व काही समान! भले माझी बुद्धी भावाच्या तुलनेत ना के बराबर😅 पणतरीही संधी समान दिल्या जात. पुण्या जवळच्या केडगावचा जन्म, लहानपणी बऱ्याच आजारातून ती बरी झालेली. पण कष्ट वाट्याला अफाट.. एकदा तिच्या आईला अचानक चक्कर आली आणि विहिरीतून दोन हंडे घेऊन चढतअसताना ती पाहिऱ्यांवर बसली, कळशी-हंडा विहिरीत पडले आणि आजी वाचली. तेंव्हापासून आईच्याच वयाचा भाचा जगदीश व आई व धाकटा भाऊ सुभाष असे सगळेच मिळून कावडीनेपाणी भरत असत. लागेल ती मदतताईला म्हणजेच आईला करणे हा छंदच जडला जणू. त्यानंतर शिक्षणासाठी इतर भावंडांसोबत ११वीत पुण्यात आली. पण शिक्षणाचे तीनतेराच वाजले. पण शिक्षण घेण्यासाठी अर्धवेळ काम करत शिकण्याचा प्रयत्नही केला, पण भाचा पायावर पडला आणि पायमोडला, आणि शिक्षणाला खो बसल...