कर्तृत्ववान मातृभक्त

माझी मावशी नवदुर्गेची तिसरी माळ 😇🙏 मावशीच्याच सांगण्यानुसार नारद मंदिरात कीर्तनाचे वासंतिक वर्ग केल्यानंतर ह.भ.प. आफळे बुवांकडे कीर्तन, गायनाचे शिक्षण सुरू होते, आणि थेट गुजरातच्या अहमदाबादेत कीर्तन ठरलं. मी पुण्यात मीना मावशीकडे राहात होते, त्यामुळे आधी तिची परवानगी मग आईची, मी विचारताक्षणी मावशीने लगेच होकार देऊन, माझ्यासाठी बॅगही काढली. मला प्रचंड आनंद झाला.. कारण आईकडून ही परवानगी मिळण्यापूर्वी १०० प्रश्नांना सामोरं जावं लागलं असतं, त्यापेक्षा तोफेच्या समोर जाणं सोप्पं😅 असो, विनोदाचा भाग सोडला तरी, मीना मावशी BSNL ची नोकरी सांभाळून आणि घरी वयस्कर आई जिला साधं मोरीपर्यंत जायलाही माणूस लागत असे, तिला सांभाळून, मी व माझा बिलंदर भाऊ सांभाळून सुद्धा ती माझ्या प्रगती होईल असे वाटणाऱ्या कोणत्याच मार्गात अडवी आली नाही. उलट तिने कायम साथच दिली. तिच माझ्यासाठी मोलाची ठरली. मीनाक्षी अवचट, प्रवचन करताना! मला खेळायची प्रचंड आवड आणि ठिकठिकाणी जाण्याची अवेकदा संधी मिळत असे, पण खरी संधी मिळाली ती पुण्यात मावशीमुळे..सांगलीतल्या सांगलीत खोखो व्यतिरिक्तकोणता खेळ खेळले नाही. पण पुण्यात ...