फार वाईट असतं
हसऱ्या चेहेऱ्या मागचं दुःख समजणं फार वाईट असतं
डोळ्यातले खरे भाव समजणंही फार वाईट असतं
एखाद्याच्या आनंदी जिवनाला लागलेलं ग्रहण पाहणंही फार वाईट असतं
ईश्वरीकृपेला लाथाडणारी जमात पाहाणंही फार वाईट असतं
'दैव देतं अन् कर्म नेतं' या उक्तीचा प्रत्यय प्रत्यक्ष पाहाणं फार वाईट असतं
मानवी मनाला लागलेली वृथा अभिमानाची कीड पाहाणं फार वाईट असतं
अहंकाराने मदमस्त झालेली जमात पाहाणं फार वाईट असतं
माफी मागणाऱ्यालाही लाथाडणं फार वाईट असतं
लोकसेवा करणाऱ्याला लुबाडताना पाहाणं फार वाईट असतं
जननिंदेच्या पल्याड गेलेल्याला स्वनिंदेनी घायाळ होणं फार वाईट असतं
सर्वकाही जाणून अजाणते होणं फार वाईट असतं
काही गोष्टी दुर्लक्षिल्याने होतात मोठ्या, तर काही लक्ष देऊनही राहतात रित्या
लक्ष-अलक्षाच्या चक्रात अडकणंही फार वाईट असतं
जाणतेपणी अजाणते होणं फार वाईट असतं
©प्रज्ञा कुलकर्णी हस्तक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा