तुमाला बघून ठरिवलं, पोरीला शिकवनार!
एक दिवस जांब गावातला.. एक १२-१३ वर्षाचा मुलगा मी दिसले की ओरडायचा 'स्टार माझा.. स्टार माझा' आणि मी त्याच्याकडे पाहून हासत होते, मग तो आपणहुनच जवळ आला आणि म्हणला, "ओ, तुम्ही असताय ना स्टार माझावर.." मी होकारार्थी मान हालवलली, "मी तुम्हाला पाहिलंय स्टार माझावर.., पण मी स्टार माझा पाहात नाही मला पिच्चर खूप आवडतात म्हणून मी स्टार गोल्ड पाहतो..." मी खळखळून हसले...हा संवाद आहे, समर्थांच्या जांब गावतल्या शाळकरी मुलाचा आणि माझा.कीर्तनाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळते, तिथलं वातावरण, भाषा, विचार यांचाही थोड्याफार प्रमाणात परिचय होतो.. नुकतंच समर्थांच्या जांब गावला म्हणजेच जांब समर्थ या गावी कीर्तन होतं. तशी मी जांबगावला पहिल्यांदा गेलेली नाही या पूर्वीही मी दोन वेळा जांबगावला गेलीय.. ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवांच्या इच्छेने व कृपेने तिथे जााण्याचा योग आलाय. मात्र गेल्या तीन वर्षात संधी मिळूनही नोकरीच्या रहाटगाडग्यात जाणं शक्य झालं नव्हतं. या वेळी मात्र योग जुळून आला. जांब हे जालना जिल्ह्यातलं खेडेगांव. १२ते १४ तास लोडशेडींग...