पोस्ट्स

सोप्पा उपाय आणि योग्य वेळ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सोप्पा उपाय आणि योग्य वेळ

      सर्वांना आपल्यासारखाच तो, किंवा ती असं मानणं किती चूकीचं आहे, हे त्याच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.       झालं असं की ऑफिसमध्ये त्याचं आणि त्याच्या मित्राचं(अर्थात ज्या व्यक्तिला तो आपला चांगला मित्र मानत होता असा..) कडाक्याचं भांडण झालं. चूक नसतानाही त्याला वरिष्ठांच्या जोरामुळे आणि मित्राच्या खोटेपणामुळे बरंच ऐकून घ्यावं लागलं. त्यात त्याची नोकरी जाता-जाता वाचली.. आणि त्याला आयुष्यात इतका जबरदस्त वाईट, पण चांगला धडाच मिळाला जणू.. ज्याच्यावर आपला चांगला सहकारीच नव्हे तर चागला मित्र म्हणून त्यानं विश्वास ठेवला त्यानं त्याचा केसानं गळा कापला. हे सगळं सांगताना अमनला हुंदका आवरेना. आणि अमनला समजावणं मला फारच कठीण झालं.. कारण त्याला एकवेळ नोकरी गेली असती तरी चाललं असतं, पण हे असं, कारण नसताना भलतं-सलतं ऐकून घेणं नको होतं.. पण तेच घडलं होतं. आणि त्याच्या 'सोकॉल्ड' मित्रानं त्याचं नाव जितकं खराब करता येईल तितका प्रयत्न केला होता. हे सगळंच त्याच्यासाठी अनपेक्षित आणि धक्कादायक होतं. यातून बाहेर पडण्याचा त्याचा प्रयत्न स...