कठीण समय येता कोण कामास येतो
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
१७ ऑक्टोबर २०२० साली लिहिलेला कोरोना काळातला लेख
कठीण समय येता कोण कामास येतो
खऱ्या अर्थानं कोरोना काळात नेमकं काय झालं, तर सर्वांचे खरे चेहेरे समोर आले. हे अर्थातच प्रत्येकाच्या अनुभवाचे बोल आहेत. कारण हाच तो असा काळ जेंव्हा जवळचे आणि दूरचे यातले अंतरच नाहीसे झाले. घरकामगार महिला, वेगवेगळ्या दुकानातून काम करणारे सेल्समन, हॉटेल व छोट्यामोठ्या टपऱ्यांवरील कामगार, बांधकामावरील कामगार आणि बरेचसे छोटे कलाकार, गायक-वादक असे अगणित क्षेत्रातले लोक ज्यांच्या कमाईला अक्षरशः ब्रेक लागला. कारण यातील बहुतांश लोकांची कमाई ही 'काम कर आणि मोबदला उचल' अशा स्वरुपाची. काहीजण रोजंदारीवर अवलंबून तर काही आठवड्याच्या आठवड्याला कमावणारे. ज्या ज्या ठिकाणी संवेदनशील मालक होता अशा टिकाणच्या कामगारांना काम न करताही थोडंफार पगारपाणी मिळालं. मात्र जे अती व्यावहारिक आहेत अशा मालकांनी नोकरांना पर्यायानं कामगारांना त्यांची आर्थिक डबधाईची स्थिती माहिती असूनही फटकारलं. याचा परीणाम असा झाला की माणसाचे खरे चेहेरे आणि दडवलेले खरे चेहरे समोर आले.
माझ्या माहितीतल २६ वर्षाच्या उमद्या तरूणाचे उदाहरण आहे. जो मुंबई महापालिकेतील कर्मचारी होता, जीममध्ये जात असे आणि उत्तम आरोग्य लाभलेला राजबिंडा तरूण.. मात्र कोरनाची लागण झाल्याचे समजताच त्याच्या शेजाऱ्यांनी वाळीत टाकल्याप्रमाणेच वागणूक द्यायला सुरुवात केली आणि त्याचा त्या तरुणाने असा धसका घेतला की तो इतका अंथरुणाला धरलं की प्राणच सोडले.
अशी कित्ती उदाहरणं सांगितली तरी कमीच.. असो.. पण या निमित्ताने सगळ्यांचे खरे चेहरे समोर आले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा