पण तू मुद्याचं बोल!

दुनिया आहे गोल, इथे होतात सगळे झोल
पण तू मुद्याचं बोल, आता मुद्याचं बोल

नवजात बालकाला सुद्धा नाही गोड बोल
जन्मताच रुग्णालयी कसा काय होतो झोल
पण तू मुद्याचं बोल, आता मुद्याचं बोल

बाळ झाले जरा मोठे त्याला देतो लस डोस
पण कारभार सारा काळा, खाजगी रुग्णालयी झोल
पण तू मुद्याचं बोल, आता मुद्याचं बोल

घालू शाळेमध्ये आता शिकवू मराठीचे बोल
पण राज्य मराठी तरी शाळेलाच कैसी ओल
पण तू मुद्याचं बोल, आता मुद्याचं बोल

देऊ धडे शहाण्याचे आणि शिकवू चांगला रोल
सांगू आयुष्याचेचे वर्म, देऊ जीवनाचे मोल
पण तू मुद्याचं बोल, आता मुद्याचं बोल

©प्रज्ञा कुलकर्णी हस्तक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान