पोस्ट्स

मनसे आणि सेना लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आजची पिढी, मनसे आणि सेना

इमेज
      शिवसेनेमुळेच मराठी माणूस मुंबईत टिकून राहीला.. हे वाक्य आपण सर्वांनीच अनेकदा ऐकलंय.. मात्र आता हे वाक्य मागे पडणार असे संकेत मिळू लागलेत.. आमच्या शेजारी ७-८ वर्षांची एक छोटी मुलगी राहते. तिचा गडबड गोंधळ कायम सुरुच असतो, मात्र कालची तिची आरोळी माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण करुन गेली... मनसेचा विजय असो, अशी होती ती आरोळी. सहज मनात विचार आला, माझ्या पिढीला शिवसेना माहिती झाली ती मुंबईतल्या दंगलींमुळे, बाळासाहेबांच्या कुणाची भीडभाड न बाळगता घणाघाती हल्ले करणाऱ्या भाषणांमुळे, शिवसेनेच्या भगव्यामुळे, दिंदुत्वाच्या मुद्दयामुळे...आणि त्या आधीच्यांना ती माहिती होती ती मराठीच्या चळवळीमुळे..पण आजच्या पिढीला शिवसेना माहिती असावी असं काहीच घडत नाहिये.. हे सत्यय... तुलनेत आजच्या पिढीला मनसे माहिती आहे. राज ठाकरे माहिती आहे. याला कारणंही तशीच आहेत. मनसेची मराठी पाट्यांसाठी मुंबईत झालेली आंदोलनं, शाळेतील मराठी भाषा सक्तीसाठी झालेली आंदोलनं( प्रत्यक्ष झालं काही नाही हे आपण जाणतोच) वीज दरवाढीचं आंदोलन आणि त्या पेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी राज ठाकरेंची भाषणं ऐकलीयत, त्या...