रागातून व्यक्त होणाऱ्या लता मंगेशकर

स्वर्गातून अवतरलेली ती भूलोकिची 'दुर्गा' स्वरमिलाप अद्भुत 'भुपाळी'तून आर्तता 'दरबारा'तूनी आली जणू ती स्वररूपी 'कल्याणी' कलासक्त अन 'कलाश्री'च ती 'कलावती' रागिणी 'देस' गाजवी 'देशकार'ती रागातील 'जयवन्ती' 'पूर्वी' 'मेघ', 'मल्हारा' सोबत तीच 'मेघरंजनी' 'शंकरा'चीच 'ललिता गौरी' 'सरस्वती', 'श्रीवंती 'मालकंस' अन् 'भैरव' जाणी तूची 'जयजयवन्ती' 'शिवरंजनी' मग 'नारायणी' तू 'मालश्री' 'मालाराणी' 'भैरवा'चीच 'भैरवी' आणिक तूच असे भिमपलासी रसिकांची तर तू अखंड राहशील स्वरलता पण 'सरस्वती' तू भूलोकीची स्वरमाता! ©प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक