नारदमुनीवरा, तव कृपा शिरीधरा

 ७ मे २०२० रोजी केलेली नारदमुवींवरचे गीत

नारदमुनीवरा तव कृपा शिरी धरा

कर निपुण मज दे आशीर्वचा||


विश्वंभर तो दावी मार्गा
घडवी पार्था दावी कार्या
जाणून तुजला तो सन्मार्गा
घडवी योद्धा घडवी भक्ता

नारदमुनीवरा..

भक्तांमधूनी तुझीच कीर्ती
तुझीच नीति तुझीच स्फूर्ती
तू भक्तांचा महाशिरोमणी
शिकवण देसी ईश्वर चरणी

नारदमुनीवरा..

त्रिलोक भुवनी तुझीया गमना
नससी थांबा, नसते वांछा
स्वागत करिती आगत्याने
सुर-असूरही तुझसी नमिता

नारदमुनीवरा..
©प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान