वाचवलंही त्यानेच

वाचवलं त्याने रोखलंही त्यानेच

जाता जाता हाताला धरून थांबवलंही त्यानेच

मरण्यासाठीच जन्मले मी, पण प्रत्येकवेळी समजावलंही त्यानेच

जिवनातील अनेकांच्या रुपात साथही दिली त्यानेच

छळलं जेंव्हा बालपणी मग, समजावलंही त्यानेच

तारुण्यातील यश शिखरेही दाखवली बघ त्यानेच

कर्तव्याच्या वाटेवरती कर्तृत्वही दिधले त्यानेच

जिवंतपणीही मुडदा होऊन दाखवले मग त्यानेच



आयुष्याच्या गटांगळ्या मग दाखवल्याही त्यानेच

त्यातूनी तरूनी बाहेर पडणे, शिकवले मज त्यानेच

वाटाड्या तो होता-आहे-असेल ठरविले त्यानेच

निश्चिंतीच्या हिंदोळ्यावर अलगद सरकवलेही त्यानेच

जीवनाची अथांग शांती अनुभूतीस दिधली त्यानेच

कलकलाट अन् थयथयाटही दाविला मग त्यानेच

तारतम्य अन् विवेकवृत्ती घडवून आणली त्यानेच

शांतचित्त अन् उदात्त उन्नत वृत्ती दिधली 'त्यानेच'




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान