पोस्ट्स

बाकी सब झूट है... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बाकी सब झूट है...

 (19 January 2011साली लिहिलेलं)   आपल्याला वाटतं मी करतो तेच खरं, आणि तेच योग्य.... मी म्हणेन ती दिशा... त्यातच आपण म्हणलेली एखादी घटना-गोष्ट योग्य ठरली किंवा अचूक असेल तर काय विचारायलाच नको.. माझ्यासारखा मीच... मीच म्हंटलं होतं त्याला, की असं कर, असा वाग...     आपण फार अडकलेले असतो आपल्याच विश्वात.. त्यामुळेच आपण करतो तेच आणि तेच योग्य असं वाटतं.. पण आपण काहीच करत नसतो, याच अनुभव माझे काही परिचित व नातेवाईक घेत आहेत... इतकं नेटकं आयुष्य की त्यात कोणत्याच प्रकारचा अडथळा येण्याची सुतराम शक्यता नाही. सगळं कसं नीटनेटकं, टापटीप आणि व्यवस्थित.. फार कमी लोकांना असं आयुष्य उपभोगता येतं. आपल्या भारतात अशी अनेक घरं आहेत, जी सुखासीन आयुष्य जगतात.. पण याच्या आयुष्याची मला फारशी कल्पना नव्हती पण मला तशी कल्पना येईपर्यंतच त्यांच्या आयुष्यात अकस्मात कोणाचीतरी वक्र दृष्टी पडल्याप्रमाणे संकटं कोसळू लागली... इतकी की पहिली घटना घडून गेल्यावर ती निवळण्याच्या आतच पुढची घटना आ वासून उभी....     आपल्या वैऱ्याच्या आयुष्यातही असं घडू नये असं काहीतरी घडतंय... खरो...