तारकमंत्र

 https://youtu.be/L8PM7aPzWhw?feature=shared


निशंक हो निर्भय हो मना रे ।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामीपाय तिथे न्यून्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला ।।२।।

उगाची भितोसी भय हे पळु दे,
जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे ।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ।।३।।

खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त ।
कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगू स्वामी देतील हात ।।४।।

विभूति नमननाम ध्यानादी तीर्थ,
स्वामीच या पंचप्राणामृतात ।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी तया, स्वामी ज्या घेती हाती ।।५।।

श्री स्वामी समर्थ चरणारविंदार्पणमस्तू

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान