संगत

 जीवनात अशा गोष्टी आहेत ज्या जरूर आणि आवर्जून कराव्यात.... कारण आपला जन्म सर्वसामान्य नाही.. या पृथ्वीवर कोणीच विनाकारण जन्मलेला नाही. मग आपण कसं वागावं ज्यामुळे आधी आपल्यात सकारात्मक बदल होतील ते समजून घेऊयात या मुद्यातून


चांगली संगत-
संगतीचा आपल्यावर फार खोलवर परिणाम होत असतो. म्हणजे आपले मित्र मैत्रिणी, शिक्षक, आसपास राहणारे लोक, शेजारी, नातेवाईक या सर्वांच्या आवडी निवडी, विचार यांचा प्रभाव आपल्यावर कळत नकळत पडत असतो, त्यातूनच आपलेही विचार चांगले वाईट बनत असतात..
उदा- मैत्रीण भिकारी पहिली व शेवटची मदत...
चॉकलेट- रॅपर- मागून घेऊन- स्वतःच्या बॅगेत, आपल्यामुळे कचरा नको, कुठेही रॅपर फेकून पानलाळ्यात छोट्या नालीत अडकले तरी पाणी तुंबणार.. त्याचा त्रास अख्ख्या कॉलनीला किंवा त्या परिसरातल्या लोकांना...


व्यसन, पण चांगल्याचं-
मित्र-मैत्रिणींनो, माणसं चालता बोलता व्यसन करतात आणि न कळत समोरच्यालाही व्यसनाच्या आधीन करतात.. मग व्यसन नसावं का.. तर नाही, व्यसन तर हवच पण कसलं, दारू-गांजा-तंबाखू-सिगरेट-गुटखा याचं नाही तर यापेक्षा कैकपटीनं वेगळं.. आधी सांगितलेली व्यसनं माणसाल काय देतात? पैशाचा अपव्यय, शारीरिक रोग, मनाची घालमेल,, अस्वस्थता आणि निगेटिव्ह बरंच काही.. मग काय करावं, कसलं व्यसन लावावं?
यावर मला एक प्रसंग आठवतो, माझा एक मित्र खूप श्रीमंत होता, हवं ते त्याच्या पायाशी लोळण घाली, त्यात संगत बिघडली अन तो व्यसनाच्या आधीन झाला, तलफ लागलेल्या अवस्थेत तो गाडी घेऊन भरपूर भटकायचा.. आणि तलफ भागली नाही तर तडफडायचा.. एक दिवस असाच रस्त्याने जाताना त्याले आमचे  इतर मित्र मैत्रिणी रस्त्यावर घामेघूम झालेले पण  हसत हसत काही करताना दिसले व तो तिथे गाडी थांबवून त्यांच्या जवळ गेला.. आणि मग मा
त्र मित्रांनो त्या दिवसानंतर माझ्या त्या मित्राने मगे वळून पाहिलंच नाही

त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा आठवणींचा उपयोग आपल्या गरजेनुसार नक्की करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान