पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदे मातरम्

 सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम् शस्य-श्यामलाम् मातरम्॥ वन्दे मातरम्॥ १॥ शुभ्र-ज्योत्सनां पुलकित यामिनीम् फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीम् सुहासिनीम् सुमधुर-भाषिणीम्। सुखदाम् वरदाम् मातरम्॥ वन्दे मातरम्॥ २॥ कोटि-कोटि कंठ कल-कल निनाद कराले कोटि-कोटि भुजैर्धृत खरकरवाले, अबला केनो माँ एतो बोले बहुबल धारिणीम् नमामि तारिणीम् रिपुदलवारिणीम् मातरम्॥ वन्दे मातरम्॥ ३॥ तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदि तुमि मर्म त्वं हि प्राणा: शरीरे बाहु ते तुमि मां शक्ति हृदये तुमि मां भक्ति तोमारइ प्रतिमा गङि मंदिरे मंदिरे॥ वन्दे मातरम्॥ ४॥ त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणीम् कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी, नमामि त्वां, नमामि कमलाम्। अमलाम्, अतुलाम्, सुजलाम्, सुफलाम्, मातरम्॥ ५॥ श्यामलाम्, सरलाम्, सुस्मिताम्, भूषिताम् धरणीम्, भरणीम्, मातरम्॥ गवन्दे मातरम्॥ ६॥.

तारकमंत्र

 https://youtu.be/L8PM7aPzWhw?feature=shared निशंक हो निर्भय हो मना रे । प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे । अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी  ।।१।। जिथे स्वामीपाय तिथे न्यून्य काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञेवीना काळ ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला   ।।२।। उगाची भितोसी भय हे पळु दे, जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे । जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा   ।।३।। खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त । कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात   ।।४।। विभूति नमननाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात । हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी तया, स्वामी ज्या घेती हाती  ।।५।। श्री स्वामी समर्थ चरणारविंदार्पणमस्तू

गोळाबेरीज २०२३

इमेज
 खूप विचार करण्याची मला लहानपणापासूनच सवय आहे. एखादा चुकीचा जरी वागला किंवा वागली तरी मी आधी त्याच्या भूमिकेत जाऊन विचार करते की हा किंवा ही असं का बरं बोलले  वागले असतील. कारण मुळात मी फटकळ म्हणूनच प्रसिद्ध. तरी मी आता बरीच मवाळ झाले. कदाचित आता काहीही झालं तरी मुंबईत रहावं लागणार हे लक्षात आल्यानं गेल्या ७-८ वर्षात मी अशी झाले आहे कदाचित. १८ वर्षांपूर्वी मुंबईत आले तेंव्हा कुणाचीही भिडभाड न ठेवता तोंडावर वाजवून येणारी मी, आता गेल्या काही वर्षात तोंडावरची माशीही न हलल्याप्रमाणे चेहेरा स्थिर ठेऊन निमूट सहन करते. म्हणतात ना घर पहावं बांधून... त्यातली गत झालीय. पण अध्यात्म तरी दुसरं काय आहे? 'मी जे जगतेय ते जगणं ही नियतीची इच्छा आहे. आणि यातून परमार्थ शोधणे हे जीवनाचे मर्म आहे.' पण हे जर समजलं तर जगही जिंकणं कठीण नाही पण नाही जमलं तर मात्र जग तुमच्यावर हसल्याशिवाय राहणार नाही.  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात देव आपल्याला सगळे रंग दाखवतो. मग ते कधी निसर्गाचे असतात, कधी नात्यातले असतात, कधी मित्र-मैत्रिणींचे असतात, तर कधी सोबत काम करणाऱ्यांचे असतात. या सगळ्या रंगात आपणही अनेकद...

अटल बिहारी वाजपेयी १६ ऑगस्ट २०१८ रोजीची कविता

इमेज
अटल शब्द अन् अटल बुद्धीचा खजिना होता व्यासंगाचा देश कार्य अन् जन कल्याणा झिजवल्यास तू आपुल्या वहाणा गर्व  कशाचा, प्रौढी कसली अढळ राही तव अटलशी मूर्ती कधी मनोहर, कधी खोलवर कधी पुराणा रमसी कवीवर कधी अध्यात्मा, कधी समाजा कधी बोधाने प्रेरीत करिसी जनउद्धारा तव अती प्रिती स्वयंस्फूर्तीने पाही जन रिती वाङनिश्चया तू नाकारसी देशप्रेम वधू तू स्वीकारसी वक्ता म्हणूनी ते नामांकित लेखन तुमचे करते पुलकित कवित्व तुमचे स्फूर्तीदायक सरस्वतीचा तुम्हा आशीर्वच! राजकीय पटलावर वावर अनेक मित्र अन् शत्रू टिचभर राजा म्हणूनी मुकुट शिरावर मिरवी तेंव्हा अससी स्थिरचर ब्रह्मचारी परी कर्म पुजारी असा जीवात्मा होणे नाही असा जीवात्मा होणे नाही असा जीवात्मा होणे नाही ©प्रज्ञा कुलकर्णी- हस्तक

सद्गुरू स्तवन, दासबोध🙏

  II  दासबोध दशक १ - स्तवननाम      समास ४ - सद्गुरुस्तवन  II ॥श्रीराम॥ आतां सद्गुरु वर्णवेना | जेथें माया स्पर्शों सकेना | तें स्वरूप मज अज्ञाना | काये कळें ||१|| नकळे नकळे नेति नेति | ऐसें बोलतसे श्रुती | तेथें मज मूर्खाची मती | पवाडेल कोठें ||२|| मज नकळे हा विचारु | दुऱ्हूनि माझा नम- स्कारु | गुरुदेवा पैलपारु | पाववीं मज ||३|| होती स्तवनाची दुराशा | तुटला मायेचा भर्वसा | आतां असाल तैसे असा | सद्‍गुरु  स्वामी  ||४|| मायेच्या बळें करीन स्तवन | ऐसें वांछित होतें मन | माया जाली लज्यायमान | काय करूं ||५|| नातुडे मुख्य परमात्मा | म्हणौनी करावी लागे प्रतिमा | तैसा  मायायोगें  महिमा  |  वर्णीन  सद्‍गुरूचा  ||६|| आपल्या भावासारिखा मनीं | देव आठवावा ध्यानीं | तैसा  सद्‍गुरु  हा  स्तवनीं  |  स्तऊं  आतां  ||७|| जय जयाजि  सद्‍गुरुराजा | विश्वंभरा  विश्व- बीजा | परमपुरुषा मोक्षध्वजा | दीनबंधु ||८|| तुझीयेन अभयंकरें | अनावर माया हे वोसरे | जैसें  सूर्यप्रकाशें  अंधारें...

१० मुद्दे

  ऐकण्या-बोलण्या संबंधी १० मुद्दे लक्षात घ्या- जग जिंकाल! श्रवण हा सर्वात उत्तम गुण आहे, त्यामुळे कमी बोला आणि जास्त ऐका बोलताना विचार करून बोला, बोलून विचारात पडू नका फक्त फायदा आहे अशांशीच बोलू नका, सर्वांशी संवाद ठेवा कुणालाच कमी लेखू नका, तुम्हाला कोण, कधी, कसा कामी येईल सांगता येत नाही पण म्हणून विनाकारण कुणाशीही गप्पा छाटत बसू नका जन्माला आलेला प्रत्येकजण ईश्वराच्या इच्छेनेच जन्मलाय, आपल्याला कुणाला कमी लेखण्याचा अधिकार नाही. हे ध्यानात असू द्या पण एखादी व्यक्ती तुमच्याशी नीट वागत नाही म्हणून  तुम्हीह त्यांच्याशी तसंच वागू नका. अन्यथा तुम्ही व ती व्यक्ती एकाच तराजूत मोजले जाल व्यर्थ बडबडण्यात वेळ फुकट घालवू नका शक्यतो कामाचे व मोजकेच बोला वर्तन असं ठेवा जे लहानांपासून थोरांना आदर्शवत वाटेल विनाकारण इकडचा राग तिकडे काढू नका 

पण तू मुद्याचं बोल!

दुनिया आहे गोल, इथे होतात सगळे झोल पण तू मुद्याचं बोल, आता मुद्याचं बोल नवजात बालकाला सुद्धा नाही गोड बोल जन्मताच रुग्णालयी कसा काय होतो झोल पण तू मुद्याचं बोल, आता मुद्याचं बोल बाळ झाले जरा मोठे त्याला देतो लस डोस पण कारभार सारा काळा, खाजगी रुग्णालयी झोल पण तू मुद्याचं बोल, आता मुद्याचं बोल घालू शाळेमध्ये आता शिकवू मराठीचे बोल पण राज्य मराठी तरी शाळेलाच कैसी ओल पण तू मुद्याचं बोल, आता मुद्याचं बोल देऊ धडे शहाण्याचे आणि शिकवू चांगला रोल सांगू आयुष्याचेचे वर्म, देऊ जीवनाचे मोल पण तू मुद्याचं बोल, आता मुद्याचं बोल ©प्रज्ञा कुलकर्णी हस्तक

मंगलाष्टका

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं । बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं || लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् | ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || १ || गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा । कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।। क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी । पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।। लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: । गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।। अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे । रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।। राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी । ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।। आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे । रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।। लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी । रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।। दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा । धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा...

वसुबारस का करतात

  वसुबारस का साजरा करतात? वसुबारस दिवाळीची खरी सुरुवात... हिंदू चालिरितीप्ररमाणे दिवाळीची सुरुवातच वसुबारसापासून होते... वसुबारसाच्या दिवशी गाय-वासराची पूजा केली जाते. १. आपले सर्व सण सहज समजण्यासारखे आणि खूप गर्भीत आहेत. २. भारत हा कृषीप्रधान देश.. त्यामुळे आजकाल ३. जसं प्रत्येक घरात गाडी असणं प्रतिष्ठेचं असंत तसं त्या काळी गाय-बैल असणं, हे प्रतिष्ठेचं होतं किंवा गावागावातून आजही तेच प्रतिष्ठेचं लक्षण आहे ४. गाय-वासरू हे तसंच सधनतेचं प्रतीक आहे ५. घरात दुभ्ती गाय म्हणजे तुमच्या घराची खरी शोभा. असं म्हटलॆ जातं ६. शहरात राहणाऱ्यांना दुभत्या गायीचं महत्त्व पटकन नाही समजणार. पण फक्त दूधाच्या किंमती वाढल्यावर मात्र कपाळावर आठ्या पडतात लंपीमुळे सध्या अनेक दुभत्या गायी दगावल्यात, दुधाच्या उत्पादनातही घट झालीय. ७ मात्र घरात दूध-दही असणं हेच भरभराटीचं लक्षण मानलंय म्हणूनच ८. दिवाळीची सुरुवात आपण गाय-वासराप्रती कृतज्ञता व्यक्तत करून करतो.. 

नवरंग

  नवरंग काय आहे नवरंगांचं महत्त्व. नवरात्रीतच रंगांचं महत्त्व का सांगितलं जातं. हे रंग नवरात्रानिमित्त नाहीत, तर वर्षानुवर्षांचे आहेत... कारण आपलेय२कडे वाराप्रमाणे देव आणि वाराप्रामाणे रंग सांगितलेले आहेत. महत्वाच्या ७ ग्रहांना अनुसरून आपले ७ वार ठरवलेले आहेत. आणि म्हणूनच ७ रंगही आहेत, ता,ना, पि,हि,नि,पा,जां आता आधी ग्रहांप्राणे, वाराप्रमाणे, आणि देवतांप्रमाणे कसे ७ रंग निश्चित आहे ते पाहुया ग्रह    वार.     देवता  रंग चंद्र.   सोम.    शिव. पांढरा मंगळ.  मंगळ  गणपती लाल बुध.   बुध    विठ्ठल.  जांभळा-गुलाबी गुरू  गुरू    दत्त. पिवळा शुक्र शुक्र.  देवी   हिरवा शनि  शनी  हनुमान. निळा-काळा रवि  रविवार    सूर्य. नारंगी-केशरी आता नवरात्रि निमित्त या रंगाना ९ रंगात विभागलं गेलंय... ते फक्त मौज म्हणून आणि दोवीला विविध रंगातील पोषाख करतायावेत यासाठी.. तुम्ही सुद्धा दररोज या रंगांप्रमाणे पेहराव करू शकता. त्याचा फायदा हाच की ...

निवडुंगाचं फुल

इमेज
  निवडुंगाचं फुल आई होती तुझी निवडुंगाचं फुल काटेकुटे असूनही निराळी तिची झूल ओलावा नसतानाच वाढली काट्यांमध्ये  पण देवजाणे कोठून शिकली ओलावा देणे तिला वाटले काट्यांनाही कधीतरी फुटेल पाझर  पण काटेच ते, टोचणारच, त्यांना कसली कदर कळी असताना एकटी एकटी कित्तीदा ती रडली पण निवडुंगाच्या एकाही पानाने दखल नाही घेतली एक दिवस मात्र, ते रडू देवानेच पुसले अलगद आपल्या झोळीत घेऊन एका झऱ्यात सोडले झऱ्याने मग कळीला छान छान खेळवले फुल उमलेपर्यंत आपल्या कुशीतच वाढवले कळीचे फुल होताना मग अनेकांना वाटले नवल निवडुंगाचीही फुले बहरतात हाच त्यांच्यासाठी कहर फुलानेही वाटेतील काटे बाजूलाच सारले मूळ असलं काटेरी तरी ऊब देणे नाही सोडले  काट्यांकडे मागे वळून फुलाने नाही पाहिलं काट्यांशिवाय जगणं खरं, हे तिनं ताडलं  फुलाला मग एक दिवस भेटला राजकुमार 'गंध'वार्ताही न घेता गुंफुन घेतला हार राजकुमराने फुलासाठी सोडले घर दार फुलानेही राजकुमारासाठी घेतली मेहनत अपार फुलाने मग राजकुमाराला दिला छोटा राजकुमार आनंदाने बहरून गेला साराच दरबार फुलासाठी राजकुमार झटला अपार पण फुल कोमेजू लागले, त्याला सोसवेना भार ...

रागातून व्यक्त होणाऱ्या लता मंगेशकर

इमेज
स्वर्गातून अवतरलेली ती भूलोकिची 'दुर्गा' स्वरमिलाप अद्भुत 'भुपाळी'तून आर्तता 'दरबारा'तूनी आली जणू ती स्वररूपी 'कल्याणी' कलासक्त अन 'कलाश्री'च ती 'कलावती' रागिणी 'देस' गाजवी 'देशकार'ती रागातील 'जयवन्ती' 'पूर्वी' 'मेघ', 'मल्हारा' सोबत तीच 'मेघरंजनी' 'शंकरा'चीच 'ललिता गौरी' 'सरस्वती', ‍'श्रीवंती 'मालकंस' अन् 'भैरव' जाणी तूची 'जयजयवन्ती' 'शिवरंजनी' मग 'नारायणी' तू 'मालश्री' 'मालाराणी' 'भैरवा'चीच 'भैरवी' आणिक तूच असे भिमपलासी रसिकांची तर तू अखंड राहशील स्वरलता पण 'सरस्वती' तू भूलोकीची स्वरमाता! ©प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक

तू विचारतोस, यांनी काय केलं देशासाठी?

इमेज
नुकत्याच संसदीय ठरवलेल्या राऊतांच्या शब्दात, चु ति या, तू विचारतोस, यांनी काय केलं देशासाठी? कर्तव्य बजावताना त्यांनी झेलल्या गोळ्या आपल्यासाठी कर्तव्य बजावताना त्यांनी झेलली आग आपल्यासाठी कर्तव्य बजावताना त्यांनी झेलला बर्फ आपल्यासाठी कर्तव्य बजावताना त्यांनी झेलला महापूर आपल्यासाठी कर्तव्य बजावताना त्यांनी झेलला कर्दनकाळ बनून आलेला पाऊस आपल्यासाठी कर्तव्य बजावताना ते अक्षरशः होरपळले गेले आपल्यासाठी आणि नुकत्याच संसदीय ठरवलेल्या राऊतांच्या शब्दात, चु ति या, तू विचारतोस, यांनी काय केलं देशासाठी? जेंव्हा एखाद्या हॉटेलमधून फिंगरबाउलमधले हात पुसत बाहेर पडतोस, तेंव्हा तुझी तीच बोटं शाबूत राहावीत म्हणून तो उभा असतो सीमोवर तुझ्यासाठी नाइन्टी, व्हिस्की,रम, वोडका मारून मध्यरात्रीसुद्धा तुझ्या केसाला धक्का न  लागता तू घरी पोहोचतोस, कारण तोच उभा असतो रक्षणासाठी एखाद्या ललनेसोबत रासक्रीडाकरून, जरी घरी तोंडलपवत गेलास, तरी तो छाताडावर गोळ्या झेलतोय तुझ्यासाठी आणि आणि नुकत्याच संसदीय ठरवलेल्या राऊतांच्या शब्दात, चु ति या, तू विचारतोस, यांनी काय केलं देशासाठी? टिंगार वर करून गावभर हिंडतोस तेंव्हा...

स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी

  मनःशांती मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करून थकलेला एक तरुण स्वामी विवेकानंद यांचा जवळ आला आणि म्हणाला, “स्वामीजी तासन्  तास बंद खोलीत बसून मी ध्यान धारणा करतो, परंतु माझा मनाला शांती लाभत नाही.” त्यावर स्वामीजी म्हणाले, “सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव, आपल्या जवळपास राहणाऱ्या दुःखी, रोगी व भुकलेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर.” यावर त्या तरुणाने त्यांना, “एखादा रोग्यासी सेवा करताना मीच आजारी पडलो तर?” असा प्रश्न विचारला. विवेकआनंद म्हणाले, “तुझ्या या शंकेमुळे मला असे वाटते की, प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसते, म्हणूनच तुला शांती लाभत नाही. शुभकार्याला उशीर लावू नये तसेच त्यातील उणिवाही शोधू नये. हाच मनःशांती मिळवण्याचा जवळचा व उत्तम मार्ग आहे.” –---------------- 2.संकटांना घाबरू नका बनारस मध्ये असताना स्वामी विवेकानंद एकदा एका अरुंद पाय वाटेने चालले होते लाल तोंडाची माकडे त्यांचा पाठीमागे लागली. त्यांचा पासून स्वतःचा बचाव करण्या साठी स्वामीजी पळू लागले; पण ती माकडे काही त्यांचा पिच्छा सोडेना. इतक्यात पळणाऱ्या...

अन् जगदंबेची गाईन मी परडी

इमेज
आई माझी तू लेकरू मी तुझे जाऊ कुणा पाई तुला वंदुनी तुला देखुनी करीन कुरवंडी अन् जगदंबेची गाईन मी परडी तुझ्याविना मी शून्याकार गं तूच जाण मजसी जगन्नियंत्या देखिल दावी रूप महा पुत्री अन् जगदंबेची गाईन मी परडी ईश्वर सत्ता असूनी तेथे, दैव जाण नाही मीच मिरवतो मानही माझा, मीच म्हणे भारी अन् जगदंबेची गाईन मी परडी    ©प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक

'उलीवूड' रोजगाराचा मार्ग!

इमेज
  उलीवूड ना स्वार्थ ना परमार्थ,  हा तर रोजगाराचा नवा मार्ग मला तरी हे विधान मुळीच पटत नाही की 'तुम्ही बॉलिवुड यु.पी.ला हलवताय' उलटपक्षी या नव्या संकल्पनेमुळे, बॉलिवूड प्रमाणे उत्तरप्रदेशमध्ये उलीवूड तयार करण्याच्या प्रयत्नामुळे उ.प्र. मध्ये रोजगार वाढेल, आणि तो सर्व स्वरुपाचा असेल म्हणजे अगदी सुतार-लोहार-चांभार-शिंपी-न्हा वी आदी बारा बलुतेदारांपासून, बांधकाम, बागकाम, वास्तूविषारद, वाहतूक, केटरिंग अशा असंख्य क्षेत्रातील लोकांना रोजगार मिळेल. शिवाय, नवे लेखक, दिग्दर्शक, कलाकार, मॉडेल्सगी देशाला मिळतील, त्यांचीही रेलचेल वाढेल.... नव्यानं तयार होणारी इंडस्ट्री सर्वांसाठी खुली असेल त्यामुळे ऑप्शन्स वाढतील, नॅरो माइंड मेंटॅलिटी म्हणजेच संकुचित मनोवृत्तीला आळा बसेल, ती अगदी संपुष्टात येणार नाही पण कमी होईल नक्की. कारण अनेकांच्या हाताला काम मिळालेलं असेल. आणि अशा पद्धतीनं संपूर्ण भारतात ज्याप्रकारे प्रत्येक राज्याने आपली स्वतंत्रपणे विकसित केलेली इंडस्ट्री ही त्या त्या राज्यांच्या रोजगाराचा काही अंशी तरी भार नक्कीच उचलू शकेल. मग दरवेळी महाराष्ट्रातच सगळा भारत एकवटण्याची जी वेळ येते ती...

देखणेपणाची वर्गवारी

इमेज
  सुंदर देखणी, रुपाची खाण असणारी ललना, मोकळे सुंदर केस आपल्या कोमल हातानेच लिलया फिरवत जेंव्हा तुळशीवृंदीवनापाशी दिसते.. किंवा सकाळी आपल्या कुटुंबियांसाठी चहा-न्याहारीची व्यवस्था करते.. किती मस्त वाटतं ना पाहूनच. पण आजकाल अशा घटना फक्त जाहिरातीत किंवा सिनेमा-सिरियल यातच दिसतात. अशा महिला खरच आहेत का आणि त्या खरच इतक्या निवांत आणि प्रसन्न चित्त असतात का, असा प्रश्न माझ्या सारखीला हमखास पडतो. त्याचं कारणही तसंच आहे म्हणा. मी माझ्या लहानपणापासून माझी आई, मावशी, आत्या, काकू, मामी, शेजार पाजारच्या महिला यांना, सकाळी उठून घराची अवराअवर, स्वयंपाक, मुलांच्या अंघोळी, डबे, नवऱ्याला हवे नको ते पहाणे व मग स्वतःची कामावर जायची घाई असंच चित्र पाहिलंय. अगदी ९०च्या दशकाआधीपासूनच महिलांची धावपळ करत काम करण्याची पद्धत पाहिलीय. पण तरी आजही २१ व्या शतकात प्रश्न असा असतो की, समाजात वावरणारी स्त्री कशी असते, कशी असावी, कशी दिसावी, कशी रहावी, कशी वागावी... हे सगळं समाजच ठरवतो. हरकत नाही ठरवा. पण मग ती एकटीच घर-संसार सांभाळत असेल तर तिला मदतीला किंवा सहकार्याला आपला हातभार लागावा असा तरी प्रामाणिक प्रयत्न...

स्वामी विवेकानंद सांगतात

इमेज
स्वामी विवेकानंदांनी अगदी सोप्या भाषेत जीवनाचं सार सांगितलंय.. उच्च शिक्षण तेही इंग्रजांच्या राजवटीत घेऊनही, सद्गुरू श्री रामकृष्ण परमहंसांच्या कृपाषीर्वादामुऴे त्यांना अध्यात्माची उत्तम जाण होती. आणि म्हणूनच सामान्य माणूस काय विचार करतो तो कसा आनंदी राहू शकतो, कोणती तत्वं  अवलंबावीत हे त्यांनी फारच सोप्या शब्दात सांगितलंय.. पाहुया या मालिकाेतून त्यांचेच काही सुंदर विचार .... 1) आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही. 2) समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा. म्हणजेच कसलीही लाज न बाळगता ते जोमानं करा..समता वाढवा, स्वातंत्र्य जिद्दीनं मिळवा, जिज्ञासा प्रचंड वाट वा शिकण्याची वृत्ति ठेवा, उत्साह सळसळताच असू द्या, उधोग दुपट्टी नं करा... 3) स्वतःचा विकास करा आणि विसरू नका, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. म्हणजे एख 4) अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बल...

चालचलन

इमेज
    अनेकांची ओळख त्यांच्या चालीनेच होते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण चालीसंदर्भात सुचवण्यासाठीच आली १. चालणे हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार आणि यशस्वीतेचं गमक आहे २. चालणे हे सरळमार्गी असावे, ज्यामुळे आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरी ती चाल डगमगत नाही ३. कोणतीही चाल ही आधी स्वतःच्या चांगल्यासाठी असावी सोबतच आप्तेष्टांच्या, मित्र-मैत्रिणींच्या, जवळच्या व समाजाच्या  चांगल्यासाठीच आपली चाल असावी ४. सरळमार्गी लोक वाकड्या मार्गाने जातच नाहीत, असं म्हणतात, पण काहीजण मुद्दाम वाकड्यात शिरतात ५. आपली चाल वाकडी नसणं हीच खरी ओळख असावी अनेक लोक चाल खेळतात, पण ती चाल शिवरायांप्रमाणे सर्वांच्या भल्याची असावी ६. बुद्धीबळात जशा चाली महत्वाच्या असतात, तशा आयुष्यातही चालींना विशेष महत्व आहे. ७. चालणे ही निरंतर प्रक्रिया आहे. चालण्यामुळेच चालना मिऴते ८. अविरत चालणे हे जिवंतपणाचे, उत्साहाचे, चैतन्याचे लक्षण आहे. ९. आपण वेगवेगळ्या चाली चालतो, पण सर्वांचा चालविता धनी एकच, हे विसरू नका १०. कोणाच्याही वाईटासाठी खेळलेली किंवा केलेली 'चाल' कधीच यशस्वी होत नाही  

म्हणजे काय असतं?

इमेज
 ३० जानेवारी २०२२ रोजी स्फुरलेली कविता जन्माला येणं म्हणजे काय असतं कधी वस्तूरुपी तर कधी जीवरूपी पिल्लू असतं एखाद्याच्या तपश्चर्येचं फळ असतं मेहनत अन् कष्टाचं चीज असतं आणि सरते शेवटी पुन्हा नव्याने जन्माला घालणारं रोपटंही असतं जीवन जगणं म्हणतात ते काय असतं प्रत्येक गोष्टीतलं सौंदर्य असतं निखळ विचार अन् निखळ हास्य असतं गरजेला मदतीचा हात देणं असतं आणि सरते शेवटी कष्टाच्या कमाईचे दोन घास  मिळणं असतं सुख सुख म्हणतात ते काय असतं ऐशो-आरामी जीवन जगणं असतं हसत-बागडत फक्त मजेचं जीवन असतं खरं तर हे अनेकांचं बालपण असतं आणि सरते शेवटी भय-चिंतेचा लवलेशही नसणं हेच सुख असतं जगातलं सर्वात सुंदर नातं नेमकं काय असतं आई अन् बाऴाचं प्रेम असत मित्र-मैत्रिणींतलं निखळ नातं असतं नवरा-बायकोतलं सुख असतं परिवारातलं समाधान असतं आणि सरते शेवटी गुरू-शिष्याचं जन्मोजन्मींचं नातं असतं काम काम ते काय असतं कुणी नोकरी तर कुणी चाकरी करत असतं कुणी उद्योग तर कुणी धंदा करत असतं कुणी शेतात राबून सोनं पिकवत असतं आणि सरते शेवटी पोटाची खळगी भरवणारा 'दाम' देणारं, केलेलं काम असतं आयुष्य आयुष्य म्हणतात ते काय असतं बालपणात ...

कोव्हीडची कविता

इमेज
 ८ जानेवारी २०२२ रोजी मी केलेली कविता कोव्हिड नामे व्हायरस ज्याने दुर्धर केले जिणे पण व्हायरस मोठा हुशार, शहाणा चाणाक्ष आहे म्हणे नाकावरची पट्टी पाहून दुडूदुडू धावे दुरी पट्टी नसल्या मानगुटीवरी अलगद घाले मिठी कळा ही त्याच्या अंगी नाना, बहुरुपी बनुनी फिरे डॉक्टर-शास्त्रज्ञांना देखिल चकवा देतो म्हणे लग्ना जाई गरीबाच्या पण श्रीमंताशी वाकडे मसणवट्याचे सुतक न मानी, सभांचेच वावडे सण उत्सव त्या नक्कीच कळती, हसतच येई पुढे पण राजकीय नेत्यांमधूनी तो, सर सर जाई पुढे मनगटावरी घड्याळ त्याच्या, वेळ पाळितो खरे न्याहारी जेवण करूनी रात्री, सावज शोधीत फिरे व्हायरस नुसता चलाख नाही, शिक्षित आहे म्हणे अधिकारी ज्या वेळा देती पेपर वाचून कळे मैदानावर दबा धरी म्हणे, तंदुरुस्ती अडकाठी उद्यानातही तोची खेळतो, इंतरांना तो दाटी शाळेची त्या बहू आवडी स्वतःच गिरवी धडे विद्यार्थ्यांवर भडके भारी, म्हणे कशास शिक्षण हवे? आरोग्याचे धन पहावेना, रोग्याचा हा धनी पण भित्यापाठी राक्षस बनुनी सदैव राही मनी आतिथी बनुनी आला जरी तो सुशेगात राहिला अती आतिथ्या हकला आता अजीर्ण करूनी सोडा ©प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक

लेखणीत त्यांच्या तळपती तलवार।

इमेज
 बाबासाहेब पुरंदरे गेले तेंव्हा २५ नोव्हेंबर २०२१ रोजी रचलेल्या  ओळी लेखणीत त्यांच्या तळपती तलवार। जणू शिवराज्याचा लख्ख दिसे दरबार।। ना अवडंबर ना लटिका तो देखावा। हे राज्य शिवाचे व्हावे, असा उमाळा।। किती गड-किल्ल्यांना पादाक्रांतही केले। मग माझ्या शिवबाचे सुंदर चरित्र रचिले।। लखलखत्या इतिहासाला देती उजाळा। तव पदी लीन म्हणे, दावी आम्हा जीव्हाळा।। योध्याच्या वीरत्वाची दावी धार। शिवचरित्र बनते सामान्यांची ढाल।। तव जाणयाने मग कित्येक भिजल्या नजरा। आज लीन तुम्ही त्या राजा चरणी, सांगावा आमुचा मुजरा।। ©प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक

बाळासाहेबांवर पोवाडा

इमेज
२३ जानेवारी २०२१रोजी मी लिहिलेला पोवाडा   बाळासायबांचं नाव लई थोर..... बाळा सायबांचं नाव लई थोर, केला घनघोर, नेता तो थोर, संघर्ष मराठी माणसाचा संघर्ष मराठी माणसाचा केला त्यांनी न्याय समाजाचा हा जी जी जी ।। मुंबई ही मराठ्यांची शान, नको तिथं घाण, मारला बाण,  टाकला घाव वर्मा वरती टाकला घाव वर्मा वरती दाविली मराठ्यांची मग शान जी जी जी ।। मार्मिक मांडती शब्द, चित्रातून व्यंग, लेखणीत दंग,  दावी पडसाद समाजाचा दावी पडसाद समाजाचा मारी फटकारेही नेत्यांना हा जी जी जी।। ©प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक  

संगत

  जीवनात अशा गोष्टी आहेत ज्या जरूर आणि आवर्जून कराव्यात.... कारण आपला जन्म सर्वसामान्य नाही.. या पृथ्वीवर कोणीच विनाकारण जन्मलेला नाही. मग आपण कसं वागावं ज्यामुळे आधी आपल्यात सकारात्मक बदल होतील ते समजून घेऊयात या मुद्यातून चांगली संगत- संगतीचा आपल्यावर फार खोलवर परिणाम होत असतो. म्हणजे आपले मित्र मैत्रिणी, शिक्षक, आसपास राहणारे लोक, शेजारी, नातेवाईक या सर्वांच्या आवडी निवडी, विचार यांचा प्रभाव आपल्यावर कळत नकळत पडत असतो, त्यातूनच आपलेही विचार चांगले वाईट बनत असतात.. उदा- मैत्रीण भिकारी पहिली व शेवटची मदत... चॉकलेट- रॅपर- मागून घेऊन- स्वतःच्या बॅगेत, आपल्यामुळे कचरा नको, कुठेही रॅपर फेकून पानलाळ्यात छोट्या नालीत अडकले तरी पाणी तुंबणार.. त्याचा त्रास अख्ख्या कॉलनीला किंवा त्या परिसरातल्या लोकांना... व्यसन, पण चांगल्याचं- मित्र-मैत्रिणींनो, माणसं चालता बोलता व्यसन करतात आणि न कळत समोरच्यालाही व्यसनाच्या आधीन करतात.. मग व्यसन नसावं का.. तर नाही, व्यसन तर हवच पण कसलं, दारू-गांजा-तंबाखू-सिगरेट-गुटखा याचं नाही तर यापेक्षा कैकपटीनं वेगळं.. आधी सांगितलेली व्यसनं माणसाल काय देतात? पैशाचा अप...

नारदमुनीवरा, तव कृपा शिरीधरा

इमेज
 ७ मे २०२० रोजी केलेली नारदमुवींवरचे गीत नारदमुनीवरा तव कृपा शिरी धरा कर निपुण मज दे आशीर्वचा|| विश्वंभर तो दावी मार्गा घडवी पार्था दावी कार्या जाणून तुजला तो सन्मार्गा घडवी योद्धा घडवी भक्ता नारदमुनीवरा.. भक्तांमधूनी तुझीच कीर्ती तुझीच नीति तुझीच स्फूर्ती तू भक्तांचा महाशिरोमणी शिकवण देसी ईश्वर चरणी नारदमुनीवरा.. त्रिलोक भुवनी तुझीया गमना नससी थांबा, नसते वांछा स्वागत करिती आगत्याने सुर-असूरही तुझसी नमिता नारदमुनीवरा.. ©प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक  

कोपली कृष्णामाई

 १० ऑगस्ट २०१९ला लिहिलेली कविता सांगली कोल्हापूरला जणू नजर‌च लागली नजर जाईल तिकडे बगा हाय, पाणीच पाणी व्हय की व्हयकी म्हणणारी आता नाय की नाय की करू लागली चांंगली चांगली म्हणता यंदा कृष्णामाई वंगाळ वागली तीरावरच्या लेकरांना लगबगीनं भेटाय आली पण लेकरांसंगं घरादारात कृष्णामाई लईवेळ रमली पावन केलीस भूमी माझी तुझ्या पावन स्पर्शानं पण गुरं-ढोरं-बकऱ्या-मेंढरं वडूनच नेलीस जोरानं बघता बघता घरला माझ्या पडला तुझाच घेरा सगळं सोडून बेघर झाला प्रत्येक घरचा राजा पाया पडतू हात जोडतू का बाई कावलीस आमच्यावर तुझ्यामुळच तर निवांत जगलो, पण घेतलस आता फैलावर लई कमवलं तुझ्या साक्षीनं, आता झालो कफल्लक परत शून्यात नेऊन ठेवलस वाढली जीवाची धकधक कृष्णा माई तुझ्या भेटीनं झाला जीव हा कृतार्थ पुन्हा नव्याने उभे राहाण्या कर आम्हा तू समर्थ, कर आम्हा तू समर्थ! प्रज्ञा कुलकर्णी-हस्तक©

कठीण समय येता कोण कामास येतो

 १७ ऑक्टोबर २०२० साली लिहिलेला कोरोना काळातला लेख कठीण समय येता कोण कामास येतो खऱ्या अर्थानं कोरोना काळात नेमकं काय झालं, तर सर्वांचे खरे चेहेरे  समोर आले. हे अर्थातच प्रत्येकाच्या अनुभवाचे बोल आहेत. कारण हाच तो असा काळ जेंव्हा जवळचे आणि दूरचे यातले अंतरच नाहीसे झाले. घरकामगार महिला, वेगवेगळ्या दुकानातून काम करणारे सेल्समन, हॉटेल व छोट्यामोठ्या टपऱ्यांवरील कामगार, बांधकामावरील कामगार आणि बरेचसे छोटे कलाकार, गायक-वादक असे अगणित क्षेत्रातले लोक ज्यांच्या कमाईला अक्षरशः ब्रेक लागला. कारण यातील बहुतांश लोकांची कमाई ही 'काम कर आणि मोबदला उचल' अशा स्वरुपाची. काहीजण रोजंदारीवर अवलंबून तर काही आठवड्याच्या आठवड्याला कमावणारे. ज्या ज्या ठिकाणी संवेदनशील मालक होता अशा टिकाणच्या कामगारांना काम न करताही थोडंफार पगारपाणी मिळालं. मात्र जे अती व्यावहारिक आहेत अशा मालकांनी नोकरांना पर्यायानं कामगारांना त्यांची आर्थिक डबधाईची स्थिती माहिती असूनही फटकारलं. याचा परीणाम असा झाला की माणसाचे खरे चेहेरे आणि दडवलेले खरे चेहरे समोर आले. माझ्या माहितीतल २६ वर्षाच्या उमद्या तरूणाचे उदाहरण आहे. जो मुंबई म...

अबोलाचे बोल

इमेज
 "तू मला आज गम्मत देणारे", अतिशय कुतूहलभरल्या चेहेऱ्याने माझ्या पाच वर्षाच्या लेकाने मला प्रश्न केला होता. पण दीड तास वेळ घालवून कसेबसे  जेवणाऱ्या लेकाला मी उत्तर दिले, " हो तर, तुझ्या स्वप्नात येऊन देणारे मी गम्मत!" नवराही जेऊ घालण्याच्या कसरतीत सहभागी असल्याने तो ही दमला होता, पण आमचा संवाद ऐकून त्याला हसू अवरेना.. या सगळ्यात Confuseचेहेरा करत माझ्या लेकाने पुन्हा मला विचारलं, "आता हे मम्मं संपवल्यावर, तू मला गम्मत देणार ना?" पुन्हा मी, "बाळा, मी स्वप्नात येऊन मगच गम्मत देणार हं तुला." मग हसू अवरत, त्याचा बाबा न राहून म्हणालाच, "सगळे येडं बनवण्याचे धंदे सुरू आहेत तुझ्या आईचे." असो, हा संवाद नमूद करण्यामागचं कारण, एवढासा मुलगा आम्हाला ब्लॅकमेल करण्याचे नवनवे फंडे कसे, कुठून शोधून काढतो याचं आम्हाला कोडं आहे पण तो बोलू लागला याचा आनंदही वेगळाच आहे.. मुळात माझ्या लहानपणी मी लहान मुलांमध्ये खूप रमायचे, खूप खेळायचे. आणि लहान मुलं नसलीच तर वयस्क आजी-आजोबा खास करून अज्जी लोकांशी माझी खूप चांगली गट्टी जमायची. आता माझाच मुलगा ५वर्षाचा झालाय.. ...

वाचवलंही त्यानेच

इमेज
वाचवलं त्याने रोखलंही त्यानेच जाता जाता हाताला धरून थांबवलंही त्यानेच मरण्यासाठीच जन्मले मी, पण प्रत्येकवेळी समजावलंही त्यानेच जिवनातील अनेकांच्या रुपात साथही दिली त्यानेच छळलं जेंव्हा बालपणी मग, समजावलंही त्यानेच तारुण्यातील यश शिखरेही दाखवली बघ त्यानेच कर्तव्याच्या वाटेवरती कर्तृत्वही दिधले त्यानेच जिवंतपणीही मुडदा होऊन दाखवले मग त्यानेच आयुष्याच्या गटांगळ्या मग दाखवल्याही त्यानेच त्यातूनी तरूनी बाहेर पडणे, शिकवले मज त्यानेच वाटाड्या तो होता-आहे-असेल ठरविले त्यानेच निश्चिंतीच्या हिंदोळ्यावर अलगद सरकवलेही त्यानेच जीवनाची अथांग शांती अनुभूतीस दिधली त्यानेच कलकलाट अन् थयथयाटही दाविला मग त्यानेच तारतम्य अन् विवेकवृत्ती घडवून आणली त्यानेच शांतचित्त अन् उदात्त उन्नत वृत्ती दिधली 'त्यानेच'

सावळ्याची सावळी

इमेज
  सावळ्या मनाला सावळीच साद दे सावळ्या विठूला तू सुरांची गाज दे सावळीच भावना अन् सावळाच तो विठू माऊलीच्या विठ्ठलाला संत सावळ्याचा वेढू सावळेच शब्द सारे, सावळीच रित ही सावळ्याचे शब्द कानी, सावळी भावना मनी सावळी ती गाय होई सावळ्याची वत्सला सावळ्या भोळ्या जीवाची तीच सावळी कपिला सावळ्याची बासरी तर भासवी स्वर सावळे वृक्ष-वल्ली-धेनू-वारे गाती सूरही सावळे सावळेच गान गाई, कधी गोड अन् कधी कटू सावळीच भक्ती माझी सावळीच ही तुझी धिटू सावळ्याची सावळी मी, आसमंतही सावळा  सावळ्याने इष्ट केले, पुनित केले या जीवा सावळीच शब्द माला, सावळ्या गळी चढो सावळीच वर्णमाला सावळ्या चरणी वसो ©प्रज्ञा कुलकर्णी हस्तक

फार वाईट असतं

हसऱ्या चेहेऱ्या मागचं दुःख समजणं फार वाईट असतं डोळ्यातले खरे भाव समजणंही फार वाईट असतं एखाद्याच्या आनंदी जिवनाला लागलेलं ग्रहण पाहणंही फार वाईट असतं ईश्वरीकृपेला लाथाडणारी जमात पाहाणंही फार वाईट असतं 'दैव देतं अन् कर्म नेतं' या उक्तीचा प्रत्यय प्रत्यक्ष पाहाणं फार वाईट असतं मानवी मनाला लागलेली वृथा अभिमानाची कीड पाहाणं फार वाईट असतं अहंकाराने मदमस्त  झालेली जमात पाहाणं फार वाईट असतं माफी मागणाऱ्यालाही लाथाडणं फार वाईट असतं लोकसेवा करणाऱ्याला लुबाडताना पाहाणं फार वाईट असतं जननिंदेच्या पल्याड गेलेल्याला स्वनिंदेनी घायाळ होणं फार वाईट असतं सर्वकाही जाणून अजाणते होणं फार वाईट असतं काही गोष्टी दुर्लक्षिल्याने होतात मोठ्या, तर काही लक्ष देऊनही राहतात रित्या लक्ष-अलक्षाच्या चक्रात अडकणंही फार वाईट असतं जाणतेपणी अजाणते होणं फार वाईट असतं ©प्रज्ञा कुलकर्णी हस्तक