सम्रुद्ध जीवनशैली

 सम्रुद्ध जीवनशैली


प्रत्येकाची राहण्याची, जीवन जगण्याची एक कला असते.. माझा एक खूप चांगला मित्र हा जुन्या वस्तूंमध्ये प्रचंड रमणारा. त्याला एकदा त्याच्या आजीच्या जुन्या वह्या सापडल्या, आणि तो प्रचंड हरकून गेला. ते तर अगदीच स्वाभाविक होतं, मी देखील हरकूनच गेले असते. मात्र त्यानं चक्क त्या वह्यांची फ्रेम बनवली आणि घरात लावली... बघता बघता त्यानं घरामध्ये वेगवेगळ्या आकाराची घंगाळी, पायल्या,पातेली , जनावरांची शिंगे, लाकडी महिरपी असं काय नव्हतं त्याच्याकडे.... असो... तर ही होती त्याची सम्रुद्धी.


ज्याला आपण Lavish life styleम्हणतो, त्यात एका मैत्रिणीसाठी पुस्तकं हीच लॅव्हिश लाइफ होती.. तिने मराठीतल्या दिग्गजांच्या काव्यसंग्रहासहितच, फ्रेंच, स्पॅनिश, इंग्रजीतलं भरपूर भांडार जमा केलं होतं. तिच्यासाठी तेच तिचं सम्रुद्ध जीवन.


एक मैत्रीण उत्तम कलाकार, सुंदर गायची, शास्त्रीय संगीताची उपासक. मात्र तिने आजवर जितके देश पालथे घातले, तिथले दगड जमा केले. तिच्या हॉलमध्ये ते दगडही तिनं मोठ्या खुबीनं रचून ठेवलेत. दडद असूनही ते तिच्यासाठी 'द'स्टोन्स आहेत.


पण सगळ्यात महत्वाची, आणि खऱ्या  अर्थानं जीवनाला सम्रुद्धी देणारा एकजण जगतोय.. आणि त्याला चटक लागलीय लोकांसाठी धाऊन जाण्याची... सगळ्यात महत्वाचं म्हणजे, तो राजकारणी नाही.तरीही तो धावतो.. गरीबांच्या कामी येतो, श्रीमंतांनाही मदतीस धावून जातो.. कुणाच्या रुपयाचाही मिंधा नाही, सध्या हाच त्याचा धंदा आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान