पोस्ट्स

पुलकित

इमेज
  पु.ल.  पुष्कळ आणि लय भारी, म्हणजे #पु.ल.देशपांडे. इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करायचं तरी काय? म्हणजे त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, उंदरानं सिंहाच्या आयाळाच्या केसाची महती लोकांना सांगण्यासारखंच! उंदंड कार्यकर्तृत्वानं नटलेली अनेक व्यक्तिमत्व आपण पाहतो. पण पु.ल. देशपांडे सगळ्यालाच अपवाद.  पुलंच्या अफाट कार्याच्या तुलनेत मी इथे जे नमूद केले ते, सागरातल्या थेंबा इतकेच आहे, याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.   विनोदी लेखनात त्यांचा हातखंडा असला तरी, सिनेमा, नाटक, टीव्ही, रेडिओ ते ही एकवेळ ठिक, पण गायन, वादन, लेखन, विनोदी शैलीत प्रवास वर्णन, दर्जेदार भाषण, स्टँडअप कॉमेडी आणि प्रचंड दातृत्व , यापेक्षा मोठं काही असूच शकत नाही. त्यांच्या पुस्तकं, नाटक, प्रवासवर्णनांची यादी, त्यांचे काही व्हिडिओ आपल्याला इंटरनेटवर सहजी मिळतात. पण त्यांच्या दातृत्वाची फार चर्चा होत नाही. त्यांना मिळालेला सगळा पैसा ते दान करत असत. पत्नी सुनीता ठाकुर या देेखील पुरक सहचारिणी असल्याने त्यांनी पैसा साठवावा असा अट्टहास केला नाही. जीवन कसं जगावं याचं धाधांत उदाहरण म्हणजे पु.ल. दांपत्य. वरील फो...

घट्ट मैत्री (कविता)

इमेज
 मैत्री म्हणजे काय फुलाचा सुगंध उमलण्याचा आनंद आहे पण कोमेजण्याचं दुःख नाही मैत्री म्हणजे काय पाण्याचा सदाबहार झरा तिथे खळखळाट आहे, वळण, टक्केटोणपे असूनही खळाळणारं शुद्ध पाणी मैत्री म्हणजे काय चहाची तलफ चाहा मिळेल तेंव्हा मिळेल, पण तलफच आनंद देणारी मैत्री म्हणजे काय मातीचा सुगंध जलवर्षावानॆ सुखावल्याची अन् पुन्हा त्याच मातीशी घट्ट जोडल्याची वीण  मैत्री म्हणजे काय सदाबहार डेरेदार वृक्ष प्राणी-पक्षी-किटक-सर्प-मनुष्य कुणी फळे खातात, कुणी आसरा घेतात, कुणी संसारच थाटतात सगळेच फक्त आनंद लुटतात ©प्रज्ञा कुलकर्णी हस्तक

सण मोठा पण...

इमेज
विजया दशमी! कोणताही सण म्हंटलं की घरी खूप लगबग असायची. तसे घरी राहणारे आम्ही चौघेच. मी-भाऊ व आई-बाबा. पण आईला सणावारांची भारीच हौस. साफसफाई, मग देवी-देवतांच्या पितळी मूर्ती स्वच्छ करणे. मग सेवळ्यात स्वयंपाक, आणि नैवेद्य होईस्तो कुणी काहीच खायचं नाही😥. काकडी चोचणे. खोब्र खोवणे अशी शेल्की कामं मला दिली जात, पण कितीही भूक लागली तरी खाईन तर शप्पथ! एकदा सांगितलं नाही म्हणजे नाही. मग कधी एकदा नैवेद्य होतोय आणि आपण जेवतोय अशी अवस्था होई. जीव अगदीच मेटाकुटीला येई. पण सणांची पूर्वीची मजा काही औरच.. पाटीपूजन, पाटीवर सरस्वती काढून न्यायची. तिची पूजा करून बुद्धी दात्रीला नमन करायचं. घरातील अस्त्र, शस्त्रांचं पूजन.. झेंडूचे हार-तोरणं सगऴं घरीच बनत  असे. शिवाय सिमोल्लंघन म्हणजे किमान नव्या संकल्पांची मांडणी करावी लागत असे.  आता नुसत्या नटमोगऱ्या-मोगरे बनून फिरणारे पाहिले की पूर्वीची शान आठवते. कारण पूर्वी सणालाच नवे कपडे मिळत. त्यामुळे त्या कपड्यांना घातल्यावरचा रुबाब काही वेगळाच असे. आता काय, आम्ही उठ सूट कपडे घेतो, कधीही घालतो. आणि मग ऐन सणालाच घ्यायचं राहून जातं.   सणाची खरी ग...

माया, प्रेम आणि दैवी आशीर्वाद म्हणजे आजी

इमेज
माझी आजी  नवदुर्गेची नववी माळ 🙏😇 भावानं पळून जाऊन लग्न केलं. तसं करण्याचं खरं काहीच कारण नव्हतं, कारण मुलीला आई-वडिल भेटलेले, पण मुलीचे आई-वडील तिला विदेशी शिक्षणासाठी पाठवतील, आणि इकडे आपले आई-वडील त्यांच्या हिशोबानं मुली शोधत बसतील या भितीनं, त्यानं लग्न उरकलं, आणि तेंव्हा आईवडिल सांगली व भाऊ मावशीकडे पुण्यात राहात असल्याने, तिला तिच्या घरी सोडून मावशीच्या घरी आला. आणि मावशीची केसानं गळा कापल्यासारखी अवस्था झाली. कारण सांगलीत राहणारे आई-बाबा मावशीला दोषी ठरवणार अशी तिच्या मनात भिती. त्यातच ९२वर्षाची म्हातारी आजी, तिला केवढा धक्का बसेल, या भितीतच घडला प्रकार सांगितला आणि सगळं ऐकल्यावर अनपेक्षितपणे आजीनं हात पुढे केला व म्हणाली, "आणा पेढे!" क्षणार्धात घरातला सगळा ताणच निघून गेला... 'घर की मुखिया राजी, तो क्या करेगा काजी' अशी अवस्था झाली. सगळा ताण तिच्यामुळे निवळला.  आज ती हवी होती, अनेक कठीण प्रसंगांना कसं सामोरं जायचं, हे मला स्वतःला अनेकदा उमगत नाही. त्यामुळेच आजी हवी होती, प्रकर्षानं हवीच होती. तिच्या हातात सगळं विश्व होतं. एक मायेचा हात फिरला की बास्स!  तसा मी आ...

सिद्ध माता व गणितज्ञ

इमेज
देशपांडे काकू नवदुर्गेची आठवी माळ🙏😇 कॉलेजला असताना, देशपांडे काकांच्या नारायण पेठेतल्या घरी जाण्याचा योग अनेकदा आला. कारण तिथे ध्यानाला बसायला छान वाटे. बाहेरच्या खोलीत काका डोक्यावर हात ठेवत आणि मी ध्यान लावण्याचा प्रयत्न करत असे. आणि आतल्याच खोलीत देशपांडे काकू विविध वयोगटातल्या विद्यार्थ्यांना गणित शिकवत असत. १-२ वर्षात मी ८-१० वेळा गेले असेन. पण काकूंना ही प्रशांतची बहीण इतकीच माहिती होती. जेंव्हा त्यांना समजलं की मी लग्न करणार नाही, त्यांनी धोसराच लावला, "प्रज्ञा असं होऊच शकत नाही." मी त्यांच्याकडे पाहातच राहिले, कारण गणित शिकवणाऱ्या बाई जर असं भाकित करत असतील तर ते खरच भाकीत की त्यामागे काही गणित असावं? या बुचकळ्यात असतानाच त्या बोलून गेल्या, "मी सांगते तू लग्न करणार आणि काकांना आणि मला पेढे द्यायला येणार!" मी ते सगळंच हसण्यावारी नेलं. पण काकूंनी खरंचच बसल्याजागी काहीतरी गणित मांडलं आणि पुढच्या दोनच वर्षात २०१६साली मी लग्न केलं, तेपण अगदी थाटामाटात! काका-काकूंचे आशीर्वादही लाभले हे मोठं भाग्यच!😇 देशपांडे काका सिद्धपुरूषच, पण त्यांची अर्धांगिनी सुद्धा सिद्धम...

धन्वंतरीच्या आशीर्वादाने पावन

इमेज
उर्मिला ताई नवदुर्गेची सातवी माळ 🙏😇  मी साम वाहिनीवर 'शाब्बास' हा लहान मुलांसाठीचा कार्यक्रम करत असताना, मी शोधून शोधून काहीतरी अवली, हटके करणारी मुलं शोधून काढत असे. आणि त्या कार्यक्रमाचं अँकरिंगही तसाच हटके मुलगा करत असे. वरूण त्याचं नाव. दर रविवारी शूट असे आणि किमान ४ वेगवेगळ्या  क्षेत्रातली मुलं येत असत. या रविवारी अडीच वर्षाची जुळी मुलं आली होती, ते दोघे जो झेंडा दाखवू त्या देशाचं नाव सांगत असत. १५ ऑगस्ट निमित्त त्या लहानग्यांचा इंटर्व्ह्यू घ्यायची जबाबदारी १२ वर्षाच्या वरूणवर होती.😆 आता अडीच वर्षाची मुलं म्हणजे अगदीच बाळं, तरी त्यांना छान बिनबॅगनध्ये बसवलेलं.. ५-५  झेंडे दाखवून झाल्यावर मी त्यांना प्रश्न विचारायला सांगे. पण सेटवर खूप सारी खेळणी, बॉल आणि रंगीबेरंगी आकर्षक असं बरंच काही होतं, त्यामुळे हा आमचा छोटा अँकर, आSsss करून प्रश्न विचारू लागला की ती मुलं खाली वाकून बॉल उचल, किंवा जोरजोरात ओरडून यल्लो-यल्लो असे काहीतरी चाळे करत होते. वरूण वैतागून, "हम ते जाऊदे , मला सांग.." असं म्हणेपर्यंत एकजण उठून दोन बॉल घेऊन यायचा. मग दुसऱ्या मुलाला प्रश्न सुरू केला क...

मेहनती व कर्तृत्ववान

इमेज
माझी बॉस्स निखिला😊 नवदुर्गेची सहावी माळ 🙏😇  पहिल्या भेटीत मी अगं-तुगं करतच बोलले, आणि ५-६ वर्षे सिनिअर आहे समजल्यावर, जीभ चावतच मी म्हंटलं, मी काय अरे-तुरे करतेय, मॅडमच म्हणायला हवं, तशी ती खळाळून हसली आणि, "नको गं अरे-तुरेच कर" म्हणाली, शेजारीच सहकारी स्वानंद बसला होता, आम्ही आश्चर्यभरित नजरेनं पाहिलं आणि तिला म्हंटलंही की, हा तर  तुझ्या  मनाचा मोठेपणा! आणि आता अनेक ज्युनिअर्स मला अरे-तुरे करतात, ते मात्र तिला मुळीच आवडत नाही.😆 असो.  मी प्रेग्नंट असताना आम्ही कायम सोबतच जेवत असू,  इतकंच काय पण कधीच आवडीने आइस्क्रीम न खाणाऱ्या मला अमूल किंवा हॅवमोअरचं आइस्क्रीम खाण्याचं वेडही तिनेच लावलं. आज मुलगा चांगलाच आइस्क्रीम प्रेमी झालाय, हे वेगळं सांगायला नकोच! काय करावं आणि काय नको, याचे उत्तम धडे ती सतत देतच असते. मुळात मोठी बहीण आणि आमच्या ऑफिसमध्येदेखील मोठीच जबाबदारी असल्याने सर्वाांना सांभाळून घेत पुढे जाणे ही तिची जुनी सवय. थेट विषयाचा तुकडा पाडणं तिला जमत असलं तरी ती ते टाळते. अनेकांना संधी देऊन पुढे आणण्याचं कसब तिला सहजी प्राप्त आहे. माझी व तिची tv9 मधली ११...