भारताची आन बान शान अखंड राहणार

 पण माझे डोळे का पाणावले? कारण मी त्यांचं मिठ खल्लंय

आज प्रत्येकाच्या जेवणातही टाटा आहेतच. कारण मिठा पासून, चहा, स्टील, मोठाले रस्ते आणि त्यावरून धा


वणारी वाहन असं सगळं काही भारतात टाटामय आहे. 

अन्न वस्त्र निवारा आणि प्रवास अशा माणसाच्या सर्व गरजा ओळखून त्या सर्व क्षेत्रात आपली छाप सोडणारी संस्था म्हणजे टाटा! आणि याच समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा. पण हे जाज्वल्य व्यक्तिमत्व हरपलंय. गरज असेल तिथे कठोर पण मनाने हळवे, सोज्वळ, सात्विक आणि कर्तव्यनिष्ठ असं हे व्यक्तिमत्व.. देशावर आलेलं संकट म्हणजे जणू आपल्या घरावर आलेलं संकट असं मानून त्यांनी आजवर प्रत्येक गरजेच्यावेळी मदतीचा हात दिलाय.

संपत्तीला टाटा ट्रस्टमध्ये विलीन करणारे असे क्रांतीसूर्य होणे नाही.#टाटा #tata #रतनटाटा #tataindustries 

टाटाच्या जवळपास १०० कंपन्या आहेत आणि केवळ भारतातच नव्हे तर जगभरात टाटा समूहाच्या कंपन्या पसरल्यात. भारता पाठोपाठ अमेरिका आणि इंग्लंड मध्ये टाटाची उत्पादनं सर्वात जास्त वापरली जातात. एकूण १५० देशांमध्ये त्यांची उत्पादने गेल्या अनेक वर्षांपासून वापरली जातात.

रतन टाटा यांचं वैशिष्ट्य म्हणजे कल्पकतेने आणि नावीन्यपूर्ण कुणी काही सुचवलच तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ते स्वतः त्यामध्ये उतरायचे. आणि ती वस्तू पूर्णत्वास आल्यावर आणि सामान्यांच्या स्वाधीन केल्यावरच शांत बसत. बरं इतकं सार करूनही त्यापासून अलिप्त राहत असत. कोणत्याही कामाचा गवगवा किंवा दिखावा त्यांनी केला नाही. फक्त पावसात भिजणार दुचाकीवरून जाणारे कुटुंब पाहून मात्र त्यांना सामान्यांसाठी स्वस्त गाडी बनवण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी नॅनो कारच्या रुपात ती प्रत्यक्षातही आणली. नॅनो कार लॉन्चिंग वेळी मात्र ते स्वतः ती कार चालवत आले होते.


त्यांची काही वैशिष्ट्ये पाहा, ज्यातून त्यांचे विलक्षण मोठेपण सहज ध्यानात येईल.


पण मुळातच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येऊनही आणि अफाट संपत्तीचे मालक असूनही त्यांनी त्याचा कधी दिखावा केला नाही.


संत कसे दूरदृष्टीने अनेक गोष्टी ताडतात, आणि त्याप्रमने सर्वसामान्यांना मार्गदर्शन करतात, तसेच रतनजी हे द्रश्टे उद्योगपती होते. 


पण तरीही सात्विक, सोज्वळ आणि नीतिमान आणि चारित्र्यसंपन्न, आणि सगळ्यात महत्वाचे भ्रष्टाचाराचा लवलेशही नसलेली व्यक्ती.


सर्वसामान्यांना परवडेल, खिशाला जास्त झळ बसणार नाही याची काळजी घेत तशीच उत्पादने त्या त्या वर्गासाठी बनवणे.


नफ्याचा पैसा गरजवंतांना देत, आणि त्याचा कोणताही दिखावा न करता औदार्याचे घातलेलं आदर्श उदाहरण.


इतका १०० कंपन्यांचा मालक पण कुणालाही एकेरी नावाने हाक मारत नसत. ऑफिसबॉयची सुद्धा अदबीने चौकशी करत. 


त्यामुळेच मलकाबद्दल अनाहूत भीती न राहता जिव्हाळा, प्रेम निर्माण झालेले असे ते एकमेव कंपनी मालक असणार. 


त्यांनी कंपन्यांमध्ये कितीही वादविवाद झाले तरी अधिकारी वर्गाची बाजू न घेता कामगारांच्या बाजूने निर्णय घेत, कामगारांना न्याय दिला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तू विचारतोस, यांनी काय केलं देशासाठी?

राजकारणाच्या केंद्रस्थानी उद्धव ठाकरे