पुलकित

 



पु.ल. 

पुष्कळ आणि लय भारी, म्हणजे #पु.ल.देशपांडे. इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करायचं तरी काय? म्हणजे त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, उंदरानं सिंहाच्या आयाळाच्या केसाची महती लोकांना सांगण्यासारखंच! उंदंड कार्यकर्तृत्वानं नटलेली अनेक व्यक्तिमत्व आपण पाहतो. पण पु.ल. देशपांडे सगळ्यालाच अपवाद.  पुलंच्या अफाट कार्याच्या तुलनेत मी इथे जे नमूद केले ते, सागरातल्या थेंबा इतकेच आहे, याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.

 

विनोदी लेखनात त्यांचा हातखंडा असला तरी, सिनेमा, नाटक, टीव्ही, रेडिओ ते ही एकवेळ ठिक, पण गायन, वादन, लेखन, विनोदी शैलीत प्रवास वर्णन, दर्जेदार भाषण, स्टँडअप कॉमेडी आणि प्रचंड दातृत्व, यापेक्षा मोठं काही असूच शकत नाही.


त्यांच्या पुस्तकं, नाटक, प्रवासवर्णनांची यादी, त्यांचे काही व्हिडिओ आपल्याला इंटरनेटवर सहजी मिळतात. पण त्यांच्या दातृत्वाची फार चर्चा होत नाही. त्यांना मिळालेला सगळा पैसा ते दान करत असत. पत्नी सुनीता ठाकुर या देेखील पुरक सहचारिणी असल्याने त्यांनी पैसा साठवावा असा अट्टहास केला नाही. जीवन कसं जगावं याचं धाधांत उदाहरण म्हणजे पु.ल. दांपत्य.

वरील फोटो pulaprem या साइटवरचा.


देण्याबाबत आणि खास करून दुसऱ्याला देण्याबाबत पु.ल. व पत्नी सुनीता यांचा हात फारच सढळ. देण्या-घेण्यात तसा मनुष्य प्राणी कमकुवतच. कारण राजाही कुणावर उदार झाल्याखेरीज काही देत नसे. लहान मूलही हातचं पटकन सोडत नाही, त्यात पैसा देणं हे तर दुरापास्तच. पण म्हणतात ना, दान हे शक्यतो गुप्त असावं, त्याचा गाजावाजा करू नये. या उक्तिला अनुसरून त्यांनी अनेकांना सढळहस्ते मदत केली. 

त्यामुळेच त्यांचं इतर बाबींमुळे जसं महत्व वाढतं त्यापेक्षा काकणभर महत्व या दातृत्व गुणामुळे पूर्णत्वास पोहोचतं.
अशा अवली व्यक्तिमत्वाला त्यांच्या जन्मदिना निमित्त मानाचा प्रणाम🙏

त्यांची पुस्तके, इंटरनेटच्याच मदतीने...
  1. बटाट्याची चाळ
  2. अपूर्वाई
  3. दाद
  4. गणगोत
  5. पुरचुंडी
  6. हसवणूक
  7. मैत्र
  8. व्यक्ती आणि वल्ली
  9. खिल्ली
  10. चार शब्द
  11. अघळ पघळ
  12. जावे त्यांच्या देशा
  13. आपुलकी
  14. उरलंसुरलं
  15. कान्होजी आंग्रे
  16. पोरवय
  17. असा मी असामी
  18. खोगीरभरती
  19. गोळाबेरीज
  20. मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास
  21. पूर्वरंग
  22. वयम मोठम खोटम
  23. विठ्ठल तो आला आला
  24. तीन पैशाचा तमाशा
  25. तुका म्हणे आता
  26. ती फुलराणी
  27. नवे गोकुळ
  28. पुढारी पाहिजे
  29. भाग्यवान
  30. आम्ही लटके ना बोलू
  31. सुंदर मी होणार
  32. रवींद्रनाथ : तीन व्याख्याने
  33. वंग-चित्रे
  34. मित्रहो!
  35. श्रोतेहो !
  36. मोठे मासे छोटे मासे
  37. काय वाट्टेल ते होईल
  38. एक झुंज वार्‍याशी
  39. गुण गाईन आवडी
  40. पु.ल.: एक साठवण
  41. रसिकहो !
  42. तुझे आहे तुजपाशी
  43. वटवट वटवट
  44. अंमलदार
  45. टेलिफोनचा जन्म
  46. मुक्काम शांतिनिकेतन
  47. एका कोळीयाने
  48. भावगंध
  49. कोट्याधीश पुल
  50. गाठोडं
  51. द्विदल
  52. एक शून्य मी
  53. नस्ती उठाठेव
  54. पाचामुखी परमेश्वर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान