घट्ट मैत्री (कविता)
मैत्री म्हणजे काय
फुलाचा सुगंध
उमलण्याचा आनंद आहे पण कोमेजण्याचं दुःख नाही
मैत्री म्हणजे काय
पाण्याचा सदाबहार झरा
तिथे खळखळाट आहे, वळण, टक्केटोणपे असूनही खळाळणारं शुद्ध पाणी
मैत्री म्हणजे काय
चहाची तलफ
चाहा मिळेल तेंव्हा मिळेल, पण तलफच आनंद देणारी
मैत्री म्हणजे काय
मातीचा सुगंध
जलवर्षावानॆ सुखावल्याची अन् पुन्हा त्याच मातीशी घट्ट जोडल्याची वीण
मैत्री म्हणजे काय
सदाबहार डेरेदार वृक्ष
प्राणी-पक्षी-किटक-सर्प-मनुष्य कुणी फळे खातात, कुणी आसरा घेतात, कुणी संसारच थाटतात
सगळेच फक्त आनंद लुटतात
©प्रज्ञा कुलकर्णी हस्तक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा