पोस्ट्स

वारी म्हणजे काय? शासकीय पूजा म्हणजे काय?

इमेज
  वारी म्हणजे काय ? #wari #वारीम्हणजेकाय ‘ अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर ’ असं पंढरपुराचं वर्णन करता येईल.. तर काही वारकऱ्यांना संत तुकोबांच्या अभंगातील ।आनंदाचे डोही, आनंद तरंग। आनंदची अंग आनंदाचे।। या ओळींचा अनुभव येत असेल.. तर संत नामदेव म्हणतात त्याप्रमाणे ।जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले, म्हणूनी विठ्ठले कृपा केली।। असा भाव अनेक वारकऱ्यांच्या मनात आहे.. तर संतश्रेष्ठ तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे अनेक वारकऱ्यांचा अनुभव हा असा असतो आमुची मिरास पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥१॥ पांडुरंग आमुचा पिता । रखुमाबाई अमुची माता ॥२॥ भाऊ पुंडलीक मुनि । चंद्रभागा अमुची बहिणी ॥३॥ तुका जुनाट मिरासी । ठाव दिला पायापाशीं ॥४॥ आनंदाचे क्षण म्हणजे वारी, माहेरची आठवण म्हणजे वारी, संताचा सहवास म्हणजे वारी, अन् मायेची ऊब म्हणजे वारी... वारीचं असं कितीही वर्णन केलं तरी अपुरंच...       वारीची परंपरा मजल दरमजल करत जी पायवाट फक्त आणि फक्त विठ्ठल आणि संतांच्या नामाने चालली जाते ती पायवाट म्हणजेच वारी.. वारीची परंपरा तशी हजारो वर्ष जुनी आहे..   तेराव्या शतकात देखिल ह...

श्री राम आम्हाला देतो।। निखळ आनंद। समाधान। संतुष्टी

इमेज
श्री राम आम्हाला देतो।। प्रत्येक मनुष्य आपल्या कुवती प्रमाणे, म्हणजे (शारीरिक,आर्थिक, मानसिक, वैचारीक इ. इ.) कार्य करत असतो. पण खरच तो जे कार्य करतो त्यात तो समाधानी असतो का..? आणि असला तरी किती समाधानी असतो...? समाधानाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी मात्र तरीही एके ठिकाणी कुठेतरी ती समानतेवर येतेच. आता माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर, काम करताना मनासारखं काम झालं की मला फार बरं वाटतं, पण म्हणून मी समाधानी असतेच असं नाही, मात्र तेच मला एखाद्या आजी वा अजोबांनी रस्ता क्रॉस करुन देता आला तरी खूप समाधानी असल्यासारखं वाटतं. मी शाळेत असताना मला शाळा सुटण्याच्या सुमारास एक जख्ख म्हाताऱ्या आजी भेटायच्या पांढऱ्या रंगाची, त्यावर चॉकलेटी किंवा फेन्ट गुलाबी, हिरवी फुलं असलेली साडी नेसलेल्या, वय साधारण 70च्या आसपास, चेहेऱ्यावर वयाची जाणीव करुन देणाऱ्या सुरकुत्या, पांढऱ्या केसांचा छोटासा अंबाडा, उंची जेमतेम चार-साडेचार फूट, हातात काठी आणि छोटीशी पिशवी, त्यात जपाची माळ, फुलं, खडिसाखरेचा छोटा डबा असायचा. आणि त्या नेमक्या कुणाची तरी वाट पाहत उभ्या असायच्या.(अर्थातच क्रॉस करुन देणारं कोणीतरी भेटेल ...

नव्या संसद इमारतीची माहिती थोडक्यात

इमेज
 #CentralVista #संसदेचीनवीइमारत संसदेची नवी इमारत त्रिकोणाकृती आहे. नवी इमारत चार मजली आहे. टाटा प्रोजेक्टस् लिमिटेड मार्फत इमारत बांधली आहे. एचसीपी डिझाईन आणि प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा.लि. ने  डिझाइन केले आहे. लोकसभा खासदारांसाठी 888 आणि राज्यसभा खासदारांसाठी 384 आसन व्यवस्था करण्यात आलीय. पार्लमेंट हॉलमध्ये एकूण 1 हजार 224 सदस्य एकाच वेळी बसू शकतील अशी क्षमता आहे. भविष्यात दोन्ही सभागृहांची वाढीव संख्या लक्षात घेत ही व्यवस्था केलेली आहे. नव्या संसद इमारत आणि परिसराचं क्षेत्रफळ 64 हजार 500 चौरस मीटर आहे. 16 हजार 921 चौ.मी. अंडरगाऊंड. बांधकामाचा खर्च ९५०कोटींहून वाढून १२०० कोटींपर्यंत गेला, असं सांगतात. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग ही संसदेची नवीन इमारत बांधण्यासाठीची नोडल एजन्सी आहे. भारताचा लोकशाही वारसा सांगणारं ‘संविधान सभागृह’ इथे आहे. संसद सदस्यासाठी लाऊंज सभागृह, ग्रंथालय, अनेक समित्यांच्या खोल्या, भोजनगृह इथे आहे.

आपण खरे अंधश्रद्धाळू

इमेज
आपण खरे अंधश्रद्धाळू आहोत, कारण या देहावर आपला अधिकार आणि सत्ता आहे असं बहुतेक सगळ्यांना वाटतं. पण या देहावरच काय आपल्या चालण्या-बोलण्या-वागण्या-राहण्यातल्या कश्शा कश्शावरच आपला मुळीच अधिकार नाही. कदचित अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला पण हे सत्य आहे. लहानपणी आपल्या पालकांनी आपल्या पाल्यांना जे काही शिकवले त्यानंतर पुन्हा आपण त्याच चूका करायला फार गेलो नाही. आगीला हात लावू नको ते हाआआआ आहे.. असं म्हणून ते आपल्याला बाजूला करायचे, खोटं बोलू नये, वाईट ऐकू नये या शिकवणीतून आपण मोठे झालो. त्यातील अनेक गोष्टींवर अंधळेपणानं विश्वास ठेवला. का, कारण मोठे सांगतात ते योग्यच... पण अनेकदा चांगलं वागून वाईट अनूभवही आला..  त्यामुळे श्रद्धा-अंधश्रद्धा हा अनुभवाचा भाग आहे. त्याला कोणतीही लेबलं लावून चालत नाही. 

सामर्थ्य आहे चळवळीचे

इमेज
 सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करिल तयांचे। परंतु तेथे भगवंताचे आधिष्ठान पाहिजे।। सामर्थ्याची प्रत्येकाची व्याख्या निरनिराळी. सामर्थ्यातच कर्तृत्व दडलंय, पण त्याचे parameters वेगवेगळे. कुणाला कर्तृत्वाचा अभिमान असेल आणि तसे त्याचे उत्तम कार्य असेल तर त्याची दखल अख्खं जग घेतं. पण एखाद्याला चोऱ्यामाऱ्या करण्यातच कर्तृत्व दडलय असं वाटत असेल तर त्याला सर्वसामान्य, सोडाच साधू संत तरी काय करणार? पण ज्याच्यात सामर्थ्य आहे तो कधीच कुणापुढे हात पसरत नाही एकवेळ पोटाला चिमटा काढून जगेल, पण कुणाला मागणार नाही अगदीच मागायची वेळ आलीच, तर परत करण्याचीही तयारी ठेवण्याच्या विचारांचा असणार ज्याच्या बैठकीतही भगवंतचा विषय असतो, तो अनाठीयी 'विषयांना' दूरच सारतो पण ज्याच्या जगण्यात फक्त 'विषय', त्यांना हे विष आहेय, हे कसे बरे कळावे... म्हणूनच सामर्थ्यवान असूनही केवळ भगवंताचे अधिष्ठान नसल्याने भलेभले गाळपटले, तिथे तुम्हाआम्हा सामान्यांची काय गत? असो. सध्या इतकेच!

स्वामी तुम्हीच तारणहार (#कविता)

इमेज
 तुम्हीच तारणहार आमुचे  स्वामी, तुम्हीच तारणहार जगन्नियंता असुनी रक्षी आम्हा दीनपतिता पिल्लावरी जसे लक्ष घारीचे, तैसी तू माता उत्तमातही अति उत्तम जे, देण्या तू तत्पर कर्मदरिद्री आम्हीच कैसे, पात्र करा सत्वर दिलेस मजला भरभरून तू, मागता न मागता ते पेलवणे, ते वाढवणे, तुम्हीच वाहावी चिंता कर्म करण्या तत्पर असूनी विघ्ने कैसी येती हीच परीक्षा दावूनी आम्हा तूच पुन्हा तारिसी चुकलो-भुललो-क्षणभर रडलो, तुझीच ही लीला पण आभार कैसे मानू जेंव्हा देसी हास्य सुख माला हास्य फुलविसी वदनावरती तूच सर्वकर्ता तुझ्या कृपेने येती दारी अखंड शुभ वार्ता नाम तुझे मुखी अखंड राहो हीच चरणी प्रार्थना चित्त वृत्ती मन शरीर येवो अखंड तव दर्शना ©प्रज्ञा कुलकर्णी हस्तक

टिप्पिकल मराठी असल्याचा सार्थ अभिमान !

इमेज
Dear Sir, जुन्या, अल्हाददायी, अलवार मनाला हात घालणारे अनेक प्रसंग, अनेक आठवणी आपल्याला आठवतात.. आईचा पदर, दारातलं तुळशी वृंदावन, आजीनं आडाशेजारी घातलेली अंघोळ आणि बरंच काही...  खरंतर या गोष्टी तुम्हालाही आठवतातच ना.... विचारांध्ये कितीही Larger picture आणलं तरीही जुन्या आठवणींमध्ये काही माणसं रमतातच ना... मला यात कोणतीही typical middle-class Maharashtrian mentality वगैरे वाटत नाही... बंगाली माणूसही त्याच्या भाषेत हे लिहितो, तसंच अमेरिकनही त्याच्या जुन्या आठवणींची उजळणी करतो... एखाद्याला त्यात त्याचं जगणं हरवलं आहे असं वाटलं तर बिघडलं कुठं...??? हे सगळं लिहिण्याचं कारण 2010 साली माझ्या एका मराठीच बॉसने मला 'आईचा पदर, दारातलं तुळशी वृंदावन, आजीनं आडाशेजारी घातलेली अंघोळ' यावर फार वाईट comment दिली आणि ही टिप्पीकल मराठी मेंटॅलिटी असल्याचं म्हंटलं, इतकंच नाही तर त्यांनी त्यावेळी मृणाल कुलकर्णी कशी अजूनही ऑडी गाडीच घेऊन फिरते असं म्हणत तिचाही उद्धार केला होता.... त्यावर मात्र मी भडकले आणि त्यांचीच बिनपाण्यानं काढली. सिचन तेंडुलकर, माधुरी दीक्षितचं उदाहरण दिलं आणि मग मेलद्वारेस...