सामर्थ्य आहे चळवळीचे

 सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करिल तयांचे।

परंतु तेथे भगवंताचे आधिष्ठान पाहिजे।।



सामर्थ्याची प्रत्येकाची व्याख्या निरनिराळी. सामर्थ्यातच कर्तृत्व दडलंय, पण त्याचे parameters वेगवेगळे. कुणाला कर्तृत्वाचा अभिमान असेल आणि तसे त्याचे उत्तम कार्य असेल तर त्याची दखल अख्खं जग घेतं. पण एखाद्याला चोऱ्यामाऱ्या करण्यातच कर्तृत्व दडलय असं वाटत असेल तर त्याला सर्वसामान्य, सोडाच साधू संत तरी काय करणार?

पण ज्याच्यात सामर्थ्य आहे तो कधीच कुणापुढे हात पसरत नाही

एकवेळ पोटाला चिमटा काढून जगेल, पण कुणाला मागणार नाही

अगदीच मागायची वेळ आलीच, तर परत करण्याचीही तयारी ठेवण्याच्या विचारांचा असणार

ज्याच्या बैठकीतही भगवंतचा विषय असतो, तो अनाठीयी 'विषयांना' दूरच सारतो

पण ज्याच्या जगण्यात फक्त 'विषय', त्यांना हे विष आहेय, हे कसे बरे कळावे...

म्हणूनच सामर्थ्यवान असूनही केवळ भगवंताचे अधिष्ठान नसल्याने भलेभले गाळपटले, तिथे तुम्हाआम्हा सामान्यांची काय गत?

असो. सध्या इतकेच!



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान