टिप्पिकल मराठी असल्याचा सार्थ अभिमान !

Dear Sir,

जुन्या, अल्हाददायी, अलवार मनाला हात घालणारे अनेक प्रसंग, अनेक आठवणी आपल्याला आठवतात.. आईचा पदर, दारातलं तुळशी वृंदावन, आजीनं आडाशेजारी घातलेली अंघोळ आणि बरंच काही... 
खरंतर या गोष्टी तुम्हालाही आठवतातच ना....

विचारांध्ये कितीही Larger picture आणलं तरीही जुन्या आठवणींमध्ये काही माणसं रमतातच ना...



मला यात कोणतीही typical middle-class Maharashtrian mentality वगैरे वाटत नाही...

बंगाली माणूसही त्याच्या भाषेत हे लिहितो, तसंच अमेरिकनही त्याच्या जुन्या आठवणींची उजळणी करतो...


एखाद्याला त्यात त्याचं जगणं हरवलं आहे असं वाटलं तर बिघडलं कुठं...???

हे सगळं लिहिण्याचं कारण 2010 साली माझ्या एका मराठीच बॉसने मला 'आईचा पदर, दारातलं तुळशी वृंदावन, आजीनं आडाशेजारी घातलेली अंघोळ' यावर फार वाईट comment दिली आणि ही टिप्पीकल मराठी मेंटॅलिटी असल्याचं म्हंटलं, इतकंच नाही तर त्यांनी त्यावेळी मृणाल कुलकर्णी कशी अजूनही ऑडी गाडीच घेऊन फिरते असं म्हणत तिचाही उद्धार केला होता.... त्यावर मात्र मी भडकले आणि त्यांचीच बिनपाण्यानं काढली. सिचन तेंडुलकर, माधुरी दीक्षितचं उदाहरण दिलं आणि मग मेलद्वारेसुद्धा तासून काढली, ती  अशी-

सर, 
तुम्ही म्हणता..Why cannot our fathers take us to UK to show Shakespeare's and Hemingway's houses; why cannot we go to Europe to visit places where great paiters and authors once lived and created masterpieces? पण याची गरजच काय..?? माझ्या देशातच जगाला शहाणपण देऊन आलेले रथी-महारथी आहेत.. मी त्यांच्याकडून काहीतरी शिकावं असं माझ्या बापानं सांगितलं तर मला ते जास्त आवडेल... (मी सुभाषचंद्र बोसांचं कोलकात्यातलं घर पाहिलंय.. इतक्या ऐशोआरामी घरात राहून त्यांना ब्रिटिशाची नोकरी करणं सहज शक्य झालं असतं.., पण त्यांनी तसं केलं नाही)


(विवेकानंदांपुढे अनेक बुद्धीवाद्यानी लोटांगण घातलं..ते त्यांच्या विद्वत्तेला पाहून.. तिथे देश, धर्म कोणीच आड आणले नाहीत- कारण विवेकानंदांचा हेतू शुद्ध होता- त्यांचाही कोलकात्यातला मठ पाहण्यासारखा आहे, त्या भागात गेल्यारच शांत-प्रसन्न वातावरणाची अनुभूती येते..)

Shakespeare's and Hemingway's ची houses पाहून मला हा आनंद मिळणार नाही... कदाचित इतरांना मिळतही असेल, पण प्रत्येकच माणसाची नाळ आपल्या जन्मभूमीशी जरा जास्तच जोडली गेलेली असते..

Europe मधले masterpieces पहायला आवडतीलच पण त्याआधी सवरकरांनी अंदमानच्या भितींवर काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना लिहिलेलं कमला हे काव्य वाचायला जास्त आवडेल ना..
आणि मराठी बजेटबद्दल तुम्ही सांगता पण, मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचण्यातच धन्यता मानत असेल तर ती मानसिकता आधी बदलायला हवी..


मृणाल कुलकर्णीकडे पाहण्यापेक्षा मी सचिन तेंडुलकरकडे पाहीन.. त्याची श्रीमंती आहेच ना हिंदीतल्या स्टार्सना लाजवण्यासारखी.. अगदी फिल्म इंडस्टिरीतलंच उदाहरण पहायचं तर मधुर भांडारकर काय होता आणि काय झाला.. , अशुतो। गोवारिकरचं नावही आज बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठितांमध्ये आहे..

असो,

प्रत्येकाच्या भावना वेगळ्या..
त्यामुळे एखाद्याला पबमध्ये आनंद मिळतो तर कुणाला मंदिरांमध्ये..
कोणाचा आनंद कशात हे ज्यानं त्यानं ठरवावं,
म्हणूनच एखादा राजबिंडा असतो तर कुणी typical middle-class Maharashtrian mentalityवाला... :)


सर,
माणसाचा रंग-देश-धर्म-विचार वेगवेगळेच असतात, पण रक्ताचा रंग एकच असतो.. त्यामुळे तुम्हाला जशी ही typical middle-class Maharashtrian mentality वाटते तशी typical Europian mentality, typical american mentality... असतेच....

कदाचित एखादा अमेरिकन किंवा युरोपिअन बॉसही अशा टाईपच्या मेल्सना असेच रिप्लाय देत असेल आणि त्याच्या दृष्टीनं ग्रेट असलेल्यांचे दाखले देत असेल... ;P

मराठीचा अभिमान मलाही आहे #सचिनतेंडुलकर लाही आहे, #माधुरीदीक्षित लाही आहेच!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान