आपण खरे अंधश्रद्धाळू
आपण खरे अंधश्रद्धाळू आहोत, कारण या देहावर आपला अधिकार आणि सत्ता आहे असं बहुतेक सगळ्यांना वाटतं. पण या देहावरच काय आपल्या चालण्या-बोलण्या-वागण्या-राहण्यातल्या कश्शा कश्शावरच आपला मुळीच अधिकार नाही. कदचित अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला पण हे सत्य आहे. लहानपणी आपल्या पालकांनी आपल्या पाल्यांना जे काही शिकवले त्यानंतर पुन्हा आपण त्याच चूका करायला फार गेलो नाही. आगीला हात लावू नको ते हाआआआ आहे.. असं म्हणून ते आपल्याला बाजूला करायचे, खोटं बोलू नये, वाईट ऐकू नये या शिकवणीतून आपण मोठे झालो. त्यातील अनेक गोष्टींवर अंधळेपणानं विश्वास ठेवला. का, कारण मोठे सांगतात ते योग्यच... पण अनेकदा चांगलं वागून वाईट अनूभवही आला..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा