पोस्ट्स

2011 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दोन हात जोडण्याची वेळ ठरवली तर बिघडलं कुठे?

इमेज
आयुष्यात असे अनेक लोक  भेटतात, ज्यांच्याकडून आपण काही शिकावं.. पण कधी कधी वाईट वाटतं कारण काही असेही भेटतात ज्यांना आपणच काही शिकवावं... आता मी शिकवावं असं आहेच काय असं वाटेल.. पण जीवनाची सामान्य गणितं चूकवण्याचा जिथे प्रयत्न होतो तिथे काहीतरी सांगावंच वटतं.. देव न मानणारे जगात खूप लोक आहेत..  देव मानल्यानं किंवा न मानल्यानं खरंतर कोणाचंच काही बिघडत नाही.. असंच जर आहे तर आपल्या मुलांना किमान वळण लागावं यासाठी काही नियम केले तर बिघडलं कुठे..... जेवणाची वेळ पाळायची.. शाळेची वेळ पाळायची.. कॉलेजची वेळ पाळायची.. क्लासेसच्या वेळा पाळायच्या.. ऑफिसची वेळ तर पाळलीच पाहिजे... (अर्थात फक्त नोकरांनी) या वेळा  का पाळायच्या?, तर सर्वांसाठी एक नियम तसंच आपल्यलाच शिस्त लागावी, कामं योग्य त्या वेळेत व्हावीत यासाठी ...मग दोन हात जोडण्यासाठी एक वेळ दिली तर बिघडलं कुठे?? स्वयंशिस्तीचे धडे प्रत्येकानंच लहानपणी गिरवलेत.. मग त्यातलं जेवायला मांडी घालून बस, इथपासून ते अगदी वाचताना ताठ बसून वाच, उठल्या उठल्या शौचाला जा... असे काही उपदेशाचे डोस ऐकून आपण लहानपणी खूप वैतागलोय.. पण आता या सव...

Old days always will be in my heart.

इमेज
Old days always will be in my heart. I can’t forget my school days; it was great fun with friends as well as with my teachers too. Those were the special days when I was in primary school. When I was in third my class teacher loved me a lot because she had no daughter, she found a daughter in me. She had given pet name to me i.e. 'Padni'. I was famous in my school because of my mother, she was well known teacher in the same school. Still my brother was much more famous than me, because he was 'Cream' of the school. He always comes first. And I, as per my role number like 35th or 36th. Actually we are twins but I never bother for his bravery. I was very strong in playing. But whenever I participated I lose it. Now I feel I don't like human made comparison. That comparison makes man powerless. There should be a competition. Still I got first prize in singing competition when I was in third standard. There is story behind it, actually my mother was very much angry o...

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान

मी कधीच 'अ' तुकडीत न्हवते, आणि त्याचा मला सार्थ अभिमानही आहे..!! पहिली ते चवथी 'म.के. अठवले' शाळेत मी 'क' तुकडीत आणि नंतर सिटी हायस्कूलमध्ये गेल्यावर मला 'ड' :P तुकडी मिळाली होती. अर्थात मार्कांवर आधारित फक्त एकच तुकडी होती आणि ती फक्त चवथीच्या मार्कांवर आधारित होती त्यामुळे साले 'अ' ला जे चिकटले ते चिकटलेच लेकाचे.. अर्थात मला त्यांचा हेवा वगैरे कधीच वाटायचा नाही, उलट त्या वर्गातल्या ढ मुलांचीच फार कीव यायची.. कारण अ तुकडीला शिकवणारे सर्वच 'मास्तर' हि मुलं हुशारच आहेत असा (आ)ग्रह ठेवून शिकवत असत. असो. त्यांचं दुःख त्यांच्यापाशी.. त्यातच एकाच वर्षासाठी मला पुण्यातल्या शाळेत जायला मिळालं ती म्हणजे 'रेणुका स्वरुप'.. ती शाळा मला खरंचच खूप आवडली.. फक्त गाणं की खेळ या माझ्या कन्फ्युजनला घाणेकर बाईंनी फुल स्टॉप देत भरड्या आवाजात सांगितलं.. " काही खेळाबिळात जाऊ नको तुझा आवाज चांगलाय इकडेच येत जा प्रॅक्टिसला.." तेंव्हा मी बऱ्यापैकी गुणी म्हणजे थोडक्यात नंदिबैल असल्यानं मला नेमकं काय आवडतं हे कळलंच नाही.. अर्थात हे मी ११वीत जाईपर्...

भाड्याच्या घरातला आत्मा..

इमेज
जन्माला येताना कोणतीच व्याधी न घेता जन्माला आलेलं हे शरीर किती खराब करुन टाकलं मी.. आणि तेही काहीच वर्षात..  याची आता अचानक जाणीव झाली, खरं तर हे शरीर मी माझं समजते पण कदाचित काहीच वर्षात ते जळून खाक होईल.. कारण त्यातली प्राणज्योत मालवलेली असेल, हातपाय न हलवणाऱ्या मृत शरीरला कोण पोसणार? असं असूनही मी माझ्या शरीराला का जपते.. बरं आयुष्यही किती आहे याचा अंदाज नसताना आपण आपल्या शरीराची केवढी काळजी घेतो.. अगदी आपल्या स्वतःच्या घराप्रमाणे.. खरं तर आपलं स्वतःचं घर आपण कधीच बरोबर घेऊन जात नाही पण तरीही त्याची स्वच्छता राखतो, देखभाल करतो... मग हे शरीर आणि घर आपण जर बरोबर नेणारच नाही तर ते जपावं तरी का?  प्रश्नांची उत्तरं स्वतःलाच शोधायची सवय लागलेली असल्यानं याचंही उत्तर मिळालं.. देहालाच आपलं कायमस्वरुपी घर समजून बसल्यानं खरंतर ही गल्लत होते.. हा देह म्हणजेच मी, हीच मोठी चूक आपण करतो. देहाचा भार सांभळणारा आपला आत्मा म्हणजे खरा 'मी' ज्याला मीची मुळीच जाणीव नाही. तोच आत्मा शरीराचा खरा भरण पोषण कर्ता..परमेश्वरानं मला निरोगी शरीर भाड्यानं दिलंय.. त्या शरीराचा वापर करुन मला आत्मोन्नती कर...

लग्नाचा बाजार आणि perfect material..

इमेज
     मला तर मुळी लग्नच करायचं नाही.. मला अश्शीच बायको हवी.., मला बुटका आणि काळा मुलगा नको.., लठ्ठ पगाराचाच नवरा हवा... लग्नाआधीच्या मागण्या एक ना अनेक.. पण या साऱ्या मागण्या अनेकदा आपल्या कानावर पडलेल्यात.. सध्या यातली इन फॅशन मागणी म्हणजे- 'ती किंवा तो लग्नासाठी योग्य मटेरिअल हवा..', 'फ्रेंड आणि टाईमपास म्हणून ठिके, पण आयुष्य काढायचं तर तो वा ती परफेक्ट मटेरिअल असायला हवी..' यावर आढळेललं साधर्म्य      प्रत्येक गावामध्ये बाजाराचा एक दिवस-वार ठरलेला असतो.. त्यावारी आसपासच्या तसंच आजूबाजूच्या गावातूनही बरेच लोक आपला माल घेऊन येतात, कारण अपेक्षा असते की आपल्या मालाला चांगला भाव मिळेल, चांगला खपही होऊ शकेल. यामध्ये भाजीपाल्यापासून ते अगदी प्लॅस्टिकच्या वस्तूंपर्यंत सारेचजण तिथे आलेले असतात. आपण भाजीवाल्यांचं उदाहरण पाहू. ज्यात एखादा मिरचीवाला असतो तर एखादा बटाटेवाला.. असे अनेक मिरची-बटाटेवाले तिथे येणार असतात, पण या सगळ्यात आपला माल जास्त खपावा आणि त्याला चांगली किंमत मिळावी यासाठी प्रत्येकजण आपला माल चकाचक करुन आणतो.. मग तिथे येणारा ग्राहक तो मा...

Watch new website of my bro

http://www.dasbodh.com/

आमच्या आजी.. उरल्या सगळ्या त्या आठवणी..

इमेज
      आजही त्यांची आठवण आली तरी डोळ्यातलं पणी लपवणं अवघड जातं.. अशा लोकांमध्ये फक्त तिनच जण आहेत, ते म्हणजे माझे सगळ्यात मोठे काका, माझी ९७वर्षाची आजी आणि या आजी.. या आजी ना नात्याच्या ना गोत्याच्या पण लळा मात्र अगदी नात्याच्या माणसाप्रमाणे अपोआप लागला..       आमच्या आजी आतापर्यंत सगळ्यांनाच माहिती झालेल्या.. अर्थात त्या आमच्या सख्ख्या आजी न्हवत्या पण तरी आजी कोणतीही असो, आजी ती आजीच..       या आजी म्हणजे मी ज्यांच्याकडे सव्वातीन वर्षं पेइंगेस्ट म्हणून अगदी बिनधास्त, आपलं हक्काचं घर असल्याप्रमाणे राहत होते त्या. घरुन फोन असो की मित्रांचा-मैत्रिणींचा-परिचितांचा वा नातेवाईकांचा, सगळेचजण आवर्जून त्यांची चौकशी करणार. म्हणजे इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यानंतर, ..तुझ्या आजी काय म्हणतायत? अशी सगळेजण हटकून चौकशी करणार. मग मी पण त्यांची छान ख्याली-खुशाली द्यायचे. त्या सुद्धा कधी पुण्याला जाऊन आले की घरच्यांची चौकशी करायच्या, कीर्तनासाठी मी जिथेजिथे जायचे, तिथल्या वातावरणाची, लोक कसे असतात अशी चौकशी करायच्या. त्यांना मी कीर्...

मराठीची ऐशीतैशी आणि पालक

जे लोक आपल्या पाल्यांना मराठी शाळेत आवर्जून घालतात अशांचे खूप खूप अभिनंदन.. येत्या काळात मातृभाषेची ऐशीतैशी करणाऱ्यांमध्ये  ते नक्कीच नसतील.. परवा माझा मित्र आणि आमच्या शाब्बास या कार्यक्रमातील निवेदकाचे बाबा बोलत उभे होतो.. बोलता बोलता आमचा निवेदक मराठी शाळेत शिकतो हे माझ्या मित्राला कळलं, त्यानं लगेचच त्याच्या बाबांचं अभिनंदन केलं. आणि मराठी शाळांमध्ये मुलांना कसं घातलं जात नाही, आणि त्याचा कसा मुलांनाच तोटा होतो हा विषय निघाला.  खरे पाहता आमची बहुतेक सर्व पिढी मराठीतच शिकली, काही जणांना आठवीनंतर सेमी इंग्लिशचा पर्याय होता, ते तिकडे वळले, पण मराठीतच पूर्ण दहावीपर्यंत शिक्षण घेऊन डॉक्टर - इंजिनिअर बनलेल माझे मित्र आहेत. जे आज चांगल्या पदावर चांगलं काम करत आहेत. मुळात बहुतेक पालक स्वतः देखील मराठी माध्यमात शिकलेत पण त्यांच नोकरीच्या ठिकाणी कधीच आडलं नाही कारण मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी हे कॉनव्हेन्ट स्कूलच्या मुलांपेक्षा कित्येकपटीनं चांगलं असतं, हे सिद्ध झालेलं आहे. असं असतानाही जे लोक आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालण्याचा जो केविलवाणा अट्टहास क...

आठवणींना उजाळा- १. रेशन दुकान

        खूप दिवसांनी लोक रांगेत उभे राहून सामान खरेदी करताना पाहीले.. खरंतर मुंबई सारख्या ठिकाणी किराणा माल आणि तोही रांगते हा प्रकार मला अजब वाटला, पण मुंबईतल्या गरीब लोकांसाठी टेंपोंधून धान्य आणून देण्याची ही पद्धत पूर्वापार आहे म्हणे.. काहीही असो, पण मला जुन्या दिवसांची आठवण झाली.. मी लहान असताना आमच्या घरी रेशनकार्डावरचं रॉकेल आणि साखर आणली जायची. आमच्याकडे मी जवळपास चवथीत जाईपर्यंत म्हणजे १९९२ पर्यंत गॅसची शेगडी नव्हती, आमच्या घरचा स्वयंपाक आई स्टोव्ह आणि वातीचा स्टोव्ह यांच्या मदतीनं करायची. पण आईच्या हातालाच अशी चव की सारी दुनियाच तिला सुगरण म्हणत असे, कारण ती जे करते ते उत्तमच बनते ही तिची म्हणजे खऱ्या सुगरणीची खासियत आहे.. असो, मुद्दा असा की मी जशी मोठी होऊ लागले तसं, मलापण आईशिवाय रेशनच्या दुकानात जाण्याची वेळ येऊ लागली, मी पाचवीत असतानापासून हातात रॉकेलचा डबा घेऊन आई रांगेत उभं राहायला सांगायची. रॉकेल आणि साखर आणण्यासाठी रेशनच्या दुकानात आवश्यक असणाऱ्या सर्व टप्प्यांबद्दली माहिती आईनं मला दिलेली असायची.. आणि रेशनच्या दुकानातल्या काकांनाही ही एकट...

त्या दिवसाची ती किस्स्....

व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी मन्या खूपच खूष होता.. इतका की त्याचं हसणं आता जरा अती आणि नकोनकोसं वाटत होतं.. हे सगळं माझी मैत्रीण जबरदस्ती सांगत होती.. पण थोडं गॉसिप स्टाईल असल्यानं सगळेचजण ते ऐकत होते.. त्या दिवशी म्हणे त्यानं त्याची स्वप्नातली गर्ल फ्रेन्ड रुपाला गुलाब दिला आणि मन्याच्या कानाखाली वाजवण्याऐवजी म्हणे तिने तो स्वीकारला पण शिवाय म्हणे त्याला डेटिंगला सुद्धा बोलावलं.. how romantic !!, एका मुलीनं टिप्पिकल प्रतिक्रिया दिली... we 2-3 people were not much interested but listning, कारण दुसरं काहीच काम नव्हतं..(तसंही कॉलेजच्या दिवसात बहुतेक उडाणटप्पूच असतात..) पण मला नेमका 'आज नेटबॉलची प्रॅक्टिस होणार नाही' असा फोन आल्यानं मलाही बराच वेळ होता.. आम्ही ऐकत होतो आणि मन्याची कथा पुढेपुढे सरकत होती आणि फारच इंटरेस्टिंग होत होती.. मन्या आणि त्याला कधीच भाव न देणाऱ्या रुपानं त्याला भाव दिला आणि संध्याकाळची वेळही ठरली म्हणे त्यांची भेटण्याची.. मन्यानं सकाळी सकाळीच कॉलजला आल्या आल्या रुपाला गुलाब दिला होता.. आणि हाईट म्हणजे रुपाचा खराखुरा बॉयफ्रेंड त्या दिवशी तिला भेटायला सुद्धा ...

बाकी सब झूट है...

 (19 January 2011साली लिहिलेलं)   आपल्याला वाटतं मी करतो तेच खरं, आणि तेच योग्य.... मी म्हणेन ती दिशा... त्यातच आपण म्हणलेली एखादी घटना-गोष्ट योग्य ठरली किंवा अचूक असेल तर काय विचारायलाच नको.. माझ्यासारखा मीच... मीच म्हंटलं होतं त्याला, की असं कर, असा वाग...     आपण फार अडकलेले असतो आपल्याच विश्वात.. त्यामुळेच आपण करतो तेच आणि तेच योग्य असं वाटतं.. पण आपण काहीच करत नसतो, याच अनुभव माझे काही परिचित व नातेवाईक घेत आहेत... इतकं नेटकं आयुष्य की त्यात कोणत्याच प्रकारचा अडथळा येण्याची सुतराम शक्यता नाही. सगळं कसं नीटनेटकं, टापटीप आणि व्यवस्थित.. फार कमी लोकांना असं आयुष्य उपभोगता येतं. आपल्या भारतात अशी अनेक घरं आहेत, जी सुखासीन आयुष्य जगतात.. पण याच्या आयुष्याची मला फारशी कल्पना नव्हती पण मला तशी कल्पना येईपर्यंतच त्यांच्या आयुष्यात अकस्मात कोणाचीतरी वक्र दृष्टी पडल्याप्रमाणे संकटं कोसळू लागली... इतकी की पहिली घटना घडून गेल्यावर ती निवळण्याच्या आतच पुढची घटना आ वासून उभी....     आपल्या वैऱ्याच्या आयुष्यातही असं घडू नये असं काहीतरी घडतंय... खरो...