लग्नाचा बाजार आणि perfect material..
मला तर मुळी लग्नच करायचं नाही.. मला अश्शीच बायको हवी.., मला बुटका आणि काळा मुलगा नको.., लठ्ठ पगाराचाच नवरा हवा... लग्नाआधीच्या मागण्या एक ना अनेक.. पण या साऱ्या मागण्या अनेकदा आपल्या कानावर पडलेल्यात.. सध्या यातली इन फॅशन मागणी म्हणजे- 'ती किंवा तो लग्नासाठी योग्य मटेरिअल हवा..', 'फ्रेंड आणि टाईमपास म्हणून ठिके, पण आयुष्य काढायचं तर तो वा ती परफेक्ट मटेरिअल असायला हवी..'
यावर आढळेललं साधर्म्य
प्रत्येक गावामध्ये बाजाराचा एक दिवस-वार ठरलेला असतो.. त्यावारी आसपासच्या तसंच आजूबाजूच्या गावातूनही बरेच लोक आपला माल घेऊन येतात, कारण अपेक्षा असते की आपल्या मालाला चांगला भाव मिळेल, चांगला खपही होऊ शकेल. यामध्ये भाजीपाल्यापासून ते अगदी प्लॅस्टिकच्या वस्तूंपर्यंत सारेचजण तिथे आलेले असतात. आपण भाजीवाल्यांचं उदाहरण पाहू. ज्यात एखादा मिरचीवाला असतो तर एखादा बटाटेवाला.. असे अनेक मिरची-बटाटेवाले तिथे येणार असतात, पण या सगळ्यात आपला माल जास्त खपावा आणि त्याला चांगली किंमत मिळावी यासाठी प्रत्येकजण आपला माल चकाचक करुन आणतो.. मग तिथे येणारा ग्राहक तो माल स्वतः जातीनं लक्ष घालून पाहतो, त्याला आवडला तर तो घेतो नाहीतर तो पुढच्या थोड्या स्वस्तात मस्त दिसणाऱ्या मालाकडे वळतो..
अगदी असाच आणखी एक बाजार भरतो, ज्यात भाजी-पाल्याच्या ऐवजी प्रत्यक्ष माणसंच असतात.. याला बाजार न म्हणता 'मेळावा' असं गोजिरवाणं नाव दिलेलं असतं... 'वधूवर मेळावा'.. इथे फरक इतकाच असतो की, वस्तूंऐवजी प्रत्यक्ष माणसंच विकत दिली-घेतली जातात. आता इथली माणसं आपल्या मालरुपी वधूला आणि वराला कसे आणि किती सजवून आणतात हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, आणि तशी वेळही माझ्यावर येणार नाही पण आपण वाचक सूज्ञ आहा.. 'आणि सूज्ञासी सांगणे नलगे.' त्यामुळे इतर बाजारांप्रमाणे इथेही बाजार होतो.. बाजार भाव ठरतो.. काही माल विकला जातो, काही तसाच राहतो.. आणि लग्न नावाच्या पवित्र संस्काराचं नाव घेत इथले वररुपी ग्राहक वधूरुपी माल विकत घेतात, पण त्या आधी हे 'परफेक्ट मटेरिअल' (perfect material) आहे ना हे पाहूनच...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा