त्या दिवसाची ती किस्स्....

व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी मन्या खूपच खूष होता.. इतका की त्याचं हसणं आता जरा अती आणि नकोनकोसं वाटत होतं.. हे सगळं माझी मैत्रीण जबरदस्ती सांगत होती.. पण थोडं गॉसिप स्टाईल असल्यानं सगळेचजण ते ऐकत होते.. त्या दिवशी म्हणे त्यानं त्याची स्वप्नातली गर्ल फ्रेन्ड रुपाला गुलाब दिला आणि मन्याच्या कानाखाली वाजवण्याऐवजी म्हणे तिने तो स्वीकारला पण शिवाय म्हणे त्याला डेटिंगला सुद्धा बोलावलं..
how romantic !!, एका मुलीनं टिप्पिकल प्रतिक्रिया दिली... we 2-3 people were not much interested but listning, कारण दुसरं काहीच काम नव्हतं..(तसंही कॉलेजच्या दिवसात बहुतेक उडाणटप्पूच असतात..) पण मला नेमका 'आज नेटबॉलची प्रॅक्टिस होणार नाही' असा फोन आल्यानं मलाही बराच वेळ होता.. आम्ही ऐकत होतो आणि मन्याची कथा पुढेपुढे सरकत होती आणि फारच इंटरेस्टिंग होत होती..

मन्या आणि त्याला कधीच भाव न देणाऱ्या रुपानं त्याला भाव दिला आणि संध्याकाळची वेळही ठरली म्हणे त्यांची भेटण्याची.. मन्यानं सकाळी सकाळीच कॉलजला आल्या आल्या रुपाला गुलाब दिला होता.. आणि हाईट म्हणजे रुपाचा खराखुरा बॉयफ्रेंड त्या दिवशी तिला भेटायला सुद्धा आला नव्हता.. बिच्चाऱ्या रुपाची खूपच निराशा झाली, पण ती इतकी फटाकडी होती, की कधी कुणाला ठेवून देईल याचा नेम नाही त्यामुळे कुठल्याच पोरानं तिच्या पुढ्यात जाण्याचं धाडस केलं नाही. पण मन्या मुळातच बावळट.. ती आपल्या कानाखाली वाजवेल वगैरे असं त्याच्या स्वप्नातही आलं नसणार.. आणि म्हणतात ना... हर कुत्ते का दिन आता है। तसा आज मन्याचा दिवस होता.. मन्या इतका हरकला, इतका हरकला की रुपा पेक्षा तोच लाजून चूर चूर झाला!! रुपा म्हणजे नावा प्रमाणंच रुपवान.. गोरीप्पान, लाल चुटूक ओठ, काळेभोर दाट केस, नाक, डोळे, ओठ अगदी रेखीव.. चित्रात काढावेत असे.. अशा मुलीवर लाईन मारणाऱ्यांची कॉलेजमध्ये मोठी लाईन होती.. पण त्या व्हॅलेंटाईनला मात्र मन्यानं रुपावर लाईन मारणाऱ्या सगळ्या टग्यांना चारी मुंड्या चीत केलं होतं.

मन्या माझ्या मैत्रीणीचा कोणीच बरोबर नसेल तर कंपनी देणारा हक्काचा गडी.. १५ फेब्रुवारीला मन्या पुराण सुरु झालं ते अस्सं..

मन्या-  मी संध्याकाळची आतुरतेनं वाट पाहात होतो, पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूट समोर भेटून मग एकत्रच फर्ग्युसनला भेटायचा प्लॅन झाला.. मी ठरल्यावेळी तिथे पोहोचलो आणि पाहतो तर काय, रुपा माझअया आधीच तिथे आली होती.. आणि काय दिसत होती.. रागानं गाल लाल लाल झाले होते पण तिच्या लाल ड्रेसचीच झाक तिच्या चेहेर्यावर पडलीय असं वाटत होतं..

हे ऐकुन आम्हाला वाटलं आता नक्कीच मन्यानं सणसणीत कानफाडात खल्ली असणार.. पण कसलं काय, मन्यानं म्हणे तिला पटवून दिलं की तो वेळेतच आलाय आणि तिला लागलीच हातात गिफ्टचं मोठं पाकीट ठेवून तो तिच्याकडे पाहू लागला.. तिला खूप आनंद झाला होता, त्यामुळे खूष होऊन तिनं तिचा हात त्याच्या गालाजवळ नेला.. आणि अचानक ती त्याच्या तोंडावर पाणी ओतायला लागली..

'पाणी'... मगाची ओव्हर एक्सायटेड पोर्टी केकाटली... आणि मग सगळा उलगडा झाला..

हे मन्या नामक कार्ट म्हणे गुलाब देऊन घरी जे पासललं.. ते रात्री ८ वाजताच उठलं.. आणि ते सुद्धा आईनं तोंडावर पाणी मारल्यावर....

'ओह शीट्ट्.. हौ फुलिश..' असं म्हणत एकीनं आपला वेळ वाया गेला अशा आशयाचा डायलॉग टाकला... पण खरी गम्मत पुढेच होती... मन्याला बुकलून काढण्याचा प्लॅन रुपानं केला होता, तिच्या खऱ्या बॉयफ्रेंडला घेऊन ती त्याच्या बुकलण्याचा पूर्ण बंदोबस्त करुन थांबलीही होती म्हणे.. पण मन्याचा दिवस चांगला होता.. त्याला आनंदाचं इतकं भरतं आल्यानं तो मेल्यागत पसरला होता.. आणि मार खाता खाता वाचला होता. 'पण मग असं होतं तर रुपानं तो गुलाब घेतलाच कसा..' असा एक सर्वांनाच पडलेला प्रश्न कोणीतरी केला.. त्यावर कळलं की, रुपानं म्हणे त्याला जवळ येताना पाहून त्याच्या हातातला गुलाब हिसकाऊन घेत, त्याच्या थोबाडावरच मारला होता, आणि भेट संध्याकाळी.. (बघते तुला) असा दम दिला होता.. पण हे मुळातच यडछाप असल्यानं त्याला ते कळलंच नाही.. त्यानी ते सांगताना मात्र माझ्या मैत्रीणीला पूर्ण मूर्ख बनवलं.. आणि आपल्याला असल्या शेलपाट्यानं वेडे बनवल्याचा वचपा काढण्यासाठी तिनं मला आणि माझ्या बरोबरच्या ४-५ जणांना तोच पाठ वाचून दाखवला..

सगळेच तिच्यावर इतके चिडले की पुढचे तीन आठवडे तिच्याशी कोणीच बोलत नव्हतं.. पण लगेचच सबमीशन्स कंप्लिट करायची असल्यानं आणि त्याबाबतीत ती माहिर असल्यानं सगळ्यांनीच तिच्या सोबतचा अबोला सोडला.. पण तिला नाव ठेवलं 'त्या दिवशीची ती किस्स...' कारण सगळ्यांनाच बनवण्यासाठी तिनं हेच पालूपद ऐकवून सगळ्यांना एकत्र बोलवलं होतं.. असो आता सगळं अलबेल सुरु होतं.. आणि रुपा मात्र तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन मन्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होती.. पण मन्या अजूनही त्या स्वप्नातच हरवलेला होता....

(या कथेतला सर्व भाग काल्पनिक आहे, आपल्या आयुष्यातील घटनांमध्ये आणि या लेखात आपल्याला साम्य अढळलं तर तो केवळ योगायोग समजावा..)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान