भाड्याच्या घरातला आत्मा..

जन्माला येताना कोणतीच व्याधी न घेता जन्माला आलेलं हे शरीर किती खराब करुन टाकलं मी.. आणि तेही काहीच वर्षात.. 
याची आता अचानक जाणीव झाली, खरं तर हे शरीर मी माझं समजते पण कदाचित काहीच वर्षात ते जळून खाक होईल.. कारण त्यातली प्राणज्योत मालवलेली असेल, हातपाय न हलवणाऱ्या मृत शरीरला कोण पोसणार? असं असूनही मी माझ्या शरीराला का जपते.. बरं आयुष्यही किती आहे याचा अंदाज नसताना आपण आपल्या शरीराची केवढी काळजी घेतो.. अगदी आपल्या स्वतःच्या घराप्रमाणे.. खरं तर आपलं स्वतःचं घर आपण कधीच बरोबर घेऊन जात नाही पण तरीही त्याची स्वच्छता राखतो, देखभाल करतो... मग हे शरीर आणि घर आपण जर बरोबर नेणारच नाही तर ते जपावं तरी का? 

प्रश्नांची उत्तरं स्वतःलाच शोधायची सवय लागलेली असल्यानं याचंही उत्तर मिळालं..

देहालाच आपलं कायमस्वरुपी घर समजून बसल्यानं खरंतर ही गल्लत होते.. हा देह म्हणजेच मी, हीच मोठी चूक आपण करतो. देहाचा भार सांभळणारा आपला आत्मा म्हणजे खरा 'मी' ज्याला मीची मुळीच जाणीव नाही. तोच आत्मा शरीराचा खरा भरण पोषण कर्ता..परमेश्वरानं मला निरोगी शरीर भाड्यानं दिलंय.. त्या शरीराचा वापर करुन मला आत्मोन्नती करायचीय.. ही जाणीवच नसल्यानं आपण सारेच लोक शरीराचीच चिंता वाहतो, त्या आत्म्यासाठी काहीच करत नाही.  
अर्थात शरीराकडे दुर्लक्ष करुन आपण केवळ आत्मकेंद्री व्हावं असंही नाही, पण आपण पूर्णपणानंच आत्मा जणू काही नाहीच असं गृहित धरुन वागतो हे नक्की. हे इतक्या विश्वासानं मी म्हणण्याचं कारण आपण जे डोळ्यांना दिसतं त्यावर विश्वास ठेवतो, त्यामुळेच आपल्यातले काही लोक स्वतःला नास्तिक म्हणवण्यात भूषण मानतात. जर डोळ्यांना दिसतं तेच खरं असेल तर आपल्याला जीवंत ठेवणारा प्राणवायूही आपल्याला कधीच दिसत नाही. आपल्याला थंडावा देणारा दगडा-धोंड्यात वाढणाऱ्या रोपट्यांना कोण वाढवतो कोण पोसतो आपल्याला माहिती नसतं.. मुक्या जीवांना  ती अज्ञात शक्ती त्यांना पोसतेय हे पुनःपुनः उद्धृत करण्याची गरज असते असं मला वाटत नाही..
समर्थ म्हणून तर म्हणतात ना.. आम्ही काय कुणाचे खातो। श्री राम आम्हाला देतो।।

थोडक्यात काय तर,  शरीरीला जशी प्राणवायूची गरज असते तशीच एक प्राणज्योत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपल्यात कार्यरत असते. देवानं दिलेल्या या भाडे तत्त्वावरील घरात मला न अडकता त्याची केवळ देखभाल करायचीय, कारण आत्मोन्नतीच्या मार्गाकडे नेणारी शराराची साथच उपयोगी पडणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान