दोन हात जोडण्याची वेळ ठरवली तर बिघडलं कुठे?
आयुष्यात असे अनेक लोक भेटतात, ज्यांच्याकडून आपण काही शिकावं.. पण कधी कधी वाईट वाटतं कारण काही असेही भेटतात ज्यांना आपणच काही शिकवावं... आता मी शिकवावं असं आहेच काय असं वाटेल.. पण जीवनाची सामान्य गणितं चूकवण्याचा जिथे प्रयत्न होतो तिथे काहीतरी सांगावंच वटतं.. देव न मानणारे जगात खूप लोक आहेत.. देव मानल्यानं किंवा न मानल्यानं खरंतर कोणाचंच काही बिघडत नाही.. असंच जर आहे तर आपल्या मुलांना किमान वळण लागावं यासाठी काही नियम केले तर बिघडलं कुठे.....
जेवणाची वेळ पाळायची..
शाळेची वेळ पाळायची..
कॉलेजची वेळ पाळायची..
क्लासेसच्या वेळा पाळायच्या..
ऑफिसची वेळ तर पाळलीच पाहिजे... (अर्थात फक्त नोकरांनी)
या वेळा का पाळायच्या?, तर सर्वांसाठी एक नियम तसंच आपल्यलाच शिस्त लागावी, कामं योग्य त्या वेळेत व्हावीत यासाठी
...मग दोन हात जोडण्यासाठी एक वेळ दिली तर बिघडलं कुठे??
स्वयंशिस्तीचे धडे प्रत्येकानंच लहानपणी गिरवलेत.. मग त्यातलं जेवायला मांडी घालून बस, इथपासून ते अगदी वाचताना ताठ बसून वाच, उठल्या उठल्या शौचाला जा... असे काही उपदेशाचे डोस ऐकून आपण लहानपणी खूप वैतागलोय.. पण आता या सवयी लावल्याचे फायदे आपल्याला कळतायत..कॉलेजची वेळ पाळायची..
क्लासेसच्या वेळा पाळायच्या..
ऑफिसची वेळ तर पाळलीच पाहिजे... (अर्थात फक्त नोकरांनी)
या वेळा का पाळायच्या?, तर सर्वांसाठी एक नियम तसंच आपल्यलाच शिस्त लागावी, कामं योग्य त्या वेळेत व्हावीत यासाठी
...मग दोन हात जोडण्यासाठी एक वेळ दिली तर बिघडलं कुठे??
पण दुर्दैवानं एक ग्रृहस्थ असे भेटले, ज्यांच्या पत्नीनं आपल्या मुलींना शुभंकरोती म्हणायला उभं केलेलं आवडलं नाही.. आणि 'हे बंद कर', असा 'मोला'चा सल्लाही त्यांनी देऊन टाकला.. मुलांच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट फार बारकाईनं करावी लागते, त्यांच्यापुढे काहीह बोलून किंवा कसंही वागून चालत नाही.. का, तर ती मुलं त्याचं लगेच अनुकरण करतात.. हे ज्याला माहिती आहे तो, मुलांसमोर त्यांना अधिकाधिक माहिती मिळावी यासाठी प्रयत्न करतो.. तोच भाग झाला सायंप्रार्थनेचा..
संस्कार घडवण्याची गरज नसते.. आसपासची परिस्थिती मुलांवर संस्कार घडवत असते.. आणि आपल्या हिंदू प्रार्थनांमधून बरेचदा संस्कृत भाषेच्या उच्चारणातून भाषा स्वच्छ व्हायला मदत होते. म्हणूनतर पूर्वापार संस्कृत श्लोक, सुभाषितं म्हणण्याची परंपरा चालत आलिय..
हे फक्त हिंदू धर्मियांत नाही तर सर्वच धर्मांचं गणित आहे. प्रत्येक धर्मांने आपल्या इष्ट देवतेच्या नमनासाठी एक वेळ, वार निश्चित केलाय.. आपल्याला देवाच्या आठवाला वार, वेळ देण्याची गरज वाटली नाही.. कारण बहुतेक घरातून रोज संध्याकाळी प्रार्थना होत असे, आता सणावारा शिवाय हे होत नाही.. काही घरात तर सणावारालाही ओल्या पार्ट्या झडतात.. बहुतेकांच्या घरातले टीव्ही लुकलुकत असतात.. सिरिअल्सच्या वेळा न चुकता अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात.. पण दोन हात जोडण्यासाठी आपल्याला वेळ नाही..
असो..
आपल्या येत्या पिढीचं नुकसानच करायचं एखाद्यानं ठरवलं असेल तर त्याच पिढितल्या एखाद्याला आम्हीही चांगला घडवून इतरांना योग्य काय त्याचा पाठ नक्कीच देऊ.. तेंव्हा कितीही मूर्ख पालक मिळाले तरी पाल्य सूज्ञच निघतील आणि तेही मानतील की, दोन हात जोडण्यासाठी एक वेळ दिली तर बिघडलं कुठे?




छान... आपले हात एखाद्याला झोडण्यासाठी नव्हे तर जोडण्यासाठी आहेत... हे योग्य वयात कळायलाच हवं... संपूर्ण विषय चांगला मांडला आहेस...
उत्तर द्याहटवाछान!उत्कृष्ट!आवडलं.
उत्तर द्याहटवाI Love my Aai.