मराठीची ऐशीतैशी आणि पालक

जे लोक आपल्या पाल्यांना मराठी शाळेत आवर्जून घालतात अशांचे खूप खूप अभिनंदन..
येत्या काळात मातृभाषेची ऐशीतैशी करणाऱ्यांमध्ये  ते नक्कीच नसतील..

परवा माझा मित्र आणि आमच्या शाब्बास या कार्यक्रमातील निवेदकाचे बाबा बोलत उभे होतो.. बोलता बोलता आमचा निवेदक मराठी शाळेत शिकतो हे माझ्या मित्राला कळलं, त्यानं लगेचच त्याच्या बाबांचं अभिनंदन केलं. आणि मराठी शाळांमध्ये मुलांना कसं घातलं जात नाही, आणि त्याचा कसा मुलांनाच तोटा होतो हा विषय निघाला. 
खरे पाहता आमची बहुतेक सर्व पिढी मराठीतच शिकली, काही जणांना आठवीनंतर सेमी इंग्लिशचा पर्याय होता, ते तिकडे वळले, पण मराठीतच पूर्ण दहावीपर्यंत शिक्षण घेऊन डॉक्टर - इंजिनिअर बनलेल माझे मित्र आहेत. जे आज चांगल्या पदावर चांगलं काम करत आहेत. मुळात बहुतेक पालक स्वतः देखील मराठी माध्यमात शिकलेत पण त्यांच नोकरीच्या ठिकाणी कधीच आडलं नाही कारण मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी हे कॉनव्हेन्ट स्कूलच्या मुलांपेक्षा कित्येकपटीनं चांगलं असतं, हे सिद्ध झालेलं आहे. असं असतानाही जे लोक आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालण्याचा जो केविलवाणा अट्टहास करतात, त्यांची खरोखरीच किव येते. 
आपणच ओरडायचं मराठी शाळा मरणावस्थेत पोहोचल्यात आणि आपणच त्यांची तिरडी बांधण्याची सोय करायची, हे पोकळ पागळ मला तरी पटत नाही. मराठीच्या नावाने शंख वाजवणाऱ्यांनीतर या गोष्टीचा आजवर कधी प्रचार केलेला नाही, कारण ते स्वतःच आपल्या पाल्यांना मराठी शाळेत घालू शकलेले नाहीत त्यांचीही कीवच येते.. 

असो, हे सगळं लिहण्याचं कारण मुलांना मराठी शाळांमध्ये घाला.. आणि त्यामुळे त्यांची आणि त्यांच्या भाषेची होणारी गळचेपी रोखा
त्यातच मला आलेल्या मेलमधली माहीती इथे देत आहे.. हेवाचून येत्या काळात होऊ घातलेल्या पालकांनी विचार जरी केला तरी खूप आहे.. मी तर म्हणेन सरकारने, जे लोक आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये घालतील अशांसाठी खास बक्षिसच ठेवावं.. कारण 'लालू'च दाखवल्याशिवाय आजकाल कोणीच बधत नाही. असो सरकारं तरी आता कुठे आपली राहिली आहेत(अपेक्षा नकोच.. उगाच भंग व्हायचा...)
मला आलेला हा मेल- 

१. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच "मी माझी झाशी देणार नाही" असे म्हटले आहे.

२. रशिया, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडिओ केंद्रे आहेत.

 ३. हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात.
कराचीत (पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.

४. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.

५. मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.

६. संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडिया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.

७. महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.

८. देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.

९. सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे.

१०. पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले होते. तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय क्रमांकावर होती. आज मराठीचे स्थान दहावे आहे.

मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचले

टिप्पण्या

  1. प्रज्ञा, तुझे म्हणणे मला शतश: मान्य आहे...

    एक गमतीशीर निरीक्षण आहे....

    मी आजकाल सर्व महत्वाची सोफ़्ट्वेअर्स मराठीतून वापरतो...
    गूगल,जीमेल,याहू, मोझिला फ़ायरफ़ॊक्स, आउटलूक, इंटरनेट एक्सप्लोअरर, अहो इतकेच काय तर चक्क विंडोज देखील मी शुद्ध मराठीतून वापरतो...आजकाल भारतीय भाषा नसलेले मोबाईल्स मिळणे देखील दुरापास्त झालेले आहे...

    तात्पर्य, सर्वच उत्पादकांना आता मातृभाषेत आपापले उत्पादन विकण्याचे महत्व आणि फ़ायदे कळालेले आहेत.

    आता माझा प्रश्न असा आहे,

    खरोखरीच आपल्या पोरांना इंग्रजी माध्यमात घालण्याची गरज आता उरली आहे काय???????

    विचार करा, आणि पटल्यास प्रचार व प्रसार देखील करा...

    -प्रशांत बाळकृष्ण कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  2. हिच गोष्ट द्यानात घेऊन लिहिण्याचा गाट घातला..
    पटलं तर ठिक नाहीतर मागा म्हणावं भीक...:P

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनमिळाऊ सासूबाई

कष्टाळू माता

'ढ' असल्सायाचा सार्थ अभिमान