आमच्या आजी.. उरल्या सगळ्या त्या आठवणी..
आजही त्यांची आठवण आली तरी डोळ्यातलं पणी लपवणं अवघड जातं.. अशा लोकांमध्ये फक्त तिनच जण आहेत, ते म्हणजे माझे सगळ्यात मोठे काका, माझी ९७वर्षाची आजी आणि या आजी..
या आजी ना नात्याच्या ना गोत्याच्या पण लळा मात्र अगदी नात्याच्या माणसाप्रमाणे अपोआप लागला..
आमच्या आजी आतापर्यंत सगळ्यांनाच माहिती झालेल्या.. अर्थात त्या आमच्या सख्ख्या आजी न्हवत्या पण तरी आजी कोणतीही असो, आजी ती आजीच..
या आजी म्हणजे मी ज्यांच्याकडे सव्वातीन वर्षं पेइंगेस्ट म्हणून अगदी बिनधास्त, आपलं हक्काचं घर असल्याप्रमाणे राहत होते त्या. घरुन फोन असो की मित्रांचा-मैत्रिणींचा-परिचितांचा वा नातेवाईकांचा, सगळेचजण आवर्जून त्यांची चौकशी करणार. म्हणजे इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यानंतर, ..तुझ्या आजी काय म्हणतायत? अशी सगळेजण हटकून चौकशी करणार. मग मी पण त्यांची छान ख्याली-खुशाली द्यायचे. त्या सुद्धा कधी पुण्याला जाऊन आले की घरच्यांची चौकशी करायच्या, कीर्तनासाठी मी जिथेजिथे जायचे, तिथल्या वातावरणाची, लोक कसे असतात अशी चौकशी करायच्या. त्यांना मी कीर्तनाहून किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाऊन आल्यावर मला काय काय मिळालं हे पहायला फार आवडायचं. त्यांच्या चेहेरा इतका खुलायचा की जणू काही सगळं त्यांनाच मिळालय.. मला मिळालेली पुस्तकं त्याच वाचून काढायच्या. सगळंच त्यांना खूप आवडायचं. फक्त मला मिळणाऱ्या शालींची संख्या जसजशी वाढू लागली तसतश्या त्या वैतागायच्या आणि म्हणायच्या काय करणार तू या शालींचं.. किती त्या शाली.. मला खूप हसू यायचं.. मग त्या पण हसायच्या.. मग मी त्यांना उत्तर दिलं की त्यांना जरा बरं वाटायचं..
आजींच्या अशा कित्येक आठवणी आता आठवणीच राहणार.. टीव्हीवरच्या सिरिअल्स अगदी मन लावून कोण पाहणार.. पोपर मधले त्यांनी वाचलेले लेख जास्तीत जास्त मनोरंजक करुन कोण सांगणार.. आम्हीच आणलेल्या पुस्तकातल्या त्यांना आवडणारे प्रसंग, माहिती कोण देणार.. शेजारच्या छोट्या जान्हवीच्या 'मीरा आजी... आमच्याकडे चला..' या तिच्या आमंत्रणावर खुमासदार उत्तर कोण देणार.. चमचमीत खायला कोण करणार.. ढोकळा, रगडा पॅटिस पाव-भाजी कोण करणार.. ही कबुतरं फार त्रास देतात, असं कोण म्हणणार.. तुम्ही माझ्या साठी एवढं कराल का, असं विनंतीवजा आर्जव कोण करणार.. तुम्ही आणता तो बटाटे वडा फार छान असतो, असं कोण म्हणणार.. कोणतीही वस्तू आणल्यावर न चूकता किती पैसे झाले, असं कोण विचारणार.. माझ्या बरोबर राहणाऱ्या मुलींची अचूक नस ओळखून, 'यांना खरं तर घरची फार आठवण येते, सारख्याच आपल्या घरी पळतात', असं कोण म्हणणार.. हळूच त्यांची काळजी वाटून चौकशी कोण करणार...
एक ना अनेक आठवणी.. पण आता फक्त आठवणीच.. मला आठवतंय, मी आणि माझी सहकारी पल्लवी जेंव्हा आजींकडे रहायला गेलो, तेंव्हा काही महिन्यातच त्यांनी आमच्यापुढे एक डायरी केली आणि म्हणाल्या, 'ए, ही डायरी कपाटात इथे असते बरं का, माझं काही झालंच तर यांना फोन करा..', (ही घटना घडल्यानंतरचा लेख याच ब्लॉगवर आहे.) हे ऐकून खरंतर कसंनुसंच वाटलं होतं. मग मी आणि पल्लवीनी त्यांना म्हंटलंही होतं, की काही नाही होणार तुम्हाला अगदी निर्धास्त राहा. तो प्रसंग मी कधीच विसरु शकणार नाही. आपल्या एकुलत्या एका मुलावर-सुनेवर आणि नातवावर त्यांचं प्रचंड प्रेम. ते आले की त्यांना बरं वाटायचं. पण त्यांच्यामुळे त्यांना त्रास होतो असंही वाटायचं.. आजींच्या घरात देवाचा ना फोटो ना मूर्ती. एक मूर्ती माझ्याच एका मैत्रिणीने भेट दिली होती.. पण तीही धूळ खात पडलेली.. टीव्हीवर शोपीस म्हणून.. देवावर विश्वास होता, पण त्या प्रचंड प्रयत्नवादी होत्या, कर्म करा आणि फळ भोगा, अशा सरळसोट विचारसरणीच्या त्या.. (पण माझ्या सांगण्यावरुन त्यांनी जपालाही सुरुवात केली होती, त्यांना मी जपाची माळ आणून दिली तेंव्हा त्या म्हणाल्या की, 'आता तूच माझी गुरू..' आणि मी नकारात्मक मान हालवत महाराजांचा फोटो दाखवला होता. )
१० मेचा त्यांचा जन्म (साल आठवत नाही, पण १९२८-२९च्या असाव्यात). आणि १६ मार्च २०११ रोजी पहाटे त्यांनी आपली इहलोकातली यात्रा संपवली. त्या अगदी ठणठणीत होत्या, त्या जाव्यात हा आमच्यासाठी धक्काच होता. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्यांना अचानक बीपीचा त्रास वाढला होता, त्यांना चक्कर यायची, पहाटेच्या वेळी त्या जवळपास तीनवेळा पडल्या होत्या. त्या खूप डेंजर पडायच्या अगदी पहाटे चार-पाचच्या सुमारास, जोरात आवाज यायचा आणि त्यांना उठवायल्या गेल्यावर त्यांना कोणचाच आधार नको असायचा. प्रचंड स्वावलंबी !!
त्या गेल्या तो गुरुवारच आणि पहाटेतचीच वेळ, फक्त मी आणि माझी रुममेट अनिता तिथे न्हवतो. त्या गेल्याची बातमी त्यांच्या मुलानं फोनवर सांगितली आणि सुन्न वाटायला लागलं.. माझी रुममेट अनिता तर ऱडायलाच लागली. कारण अगदी ठणठणीत असताना सव्वातीन वर्षापूर्वी एक महिना तिनं त्यांना पाहिलं होतं आणि या शेवटच्या तीन महिन्यात तिनं त्यांची बरीच सेवा केली होती. पूर्ण दिवस आम्हाला कसंनुसंच वाटत होतं..

hmm... aji khoop bhari hotya...hi yogya shradhanjali diliyes... she did deserve it :)
उत्तर द्याहटवाkay lihawe kalat nahi....
उत्तर द्याहटवाEk matra nakki....ya ghatanene siddha kele ki konatihi ajji aplyala aplya ajji itka jiwhala dewu shakate...tenwha asha anek ajji ya samajat ahet...ani tyanchi sewa karnyachi tuzi talmalichi iccha parameshwar poorna karo heech sadicchaa.....
dole bharun ale kharach ajji konachi hi aso tyanchya dolyat visha sathel asa prem asta....pan khar tujhi kamal ahe farach sundar bhavna vyakta kelya ahes tu ...........ajinna shradhanjali
उत्तर द्याहटवाTejashri - Pradnya, tu kharya arthani mothya kakana ani ajinna shraddhanjali dili. Ajichi maya, ticha prem, tichi astha hi vegalich aste. Pan tu tyancha character khup chaan rekhatlas. Dev tyanchya atmyala shanti devo.
उत्तर द्याहटवाखरच, त्यांना आता हिच श्रद्धांजली...
उत्तर द्याहटवा