पोस्ट्स

सम्रुद्ध जीवनशैली

इमेज
 सम्रुद्ध जीवनशैली प्रत्येकाची राहण्याची , जीवन जगण्याची एक कला असते.. माझा एक खूप चांगला मित्र हा जुन्या वस्तूंमध्ये प्रचंड रमणारा. त्याला एकदा त्याच्या आजीच्या जुन्या वह्या सापडल्या, आणि तो प्रचंड हरकून गेला. ते तर अगदीच स्वाभाविक होतं, मी देखील हरकूनच गेले असते. मात्र त्यानं चक्क त्या वह्यांची फ्रेम बनवली आणि घरात लावली... बघता बघता त्यानं घरामध्ये वेगवेगळ्या आकाराची घंगाळी, पायल्या,पातेली , जनावरांची शिंगे, लाकडी महिरपी असं काय नव्हतं त्याच्याकडे.... असो... तर ही होती त्याची सम्रुद्धी. ज्याला आपण Lavish life styleम्हणतो, त्यात एका मैत्रिणीसाठी पुस्तकं हीच लॅव्हिश लाइफ होती.. तिने मराठीतल्या दिग्गजांच्या काव्यसंग्रहासहितच, फ्रेंच, स्पॅनिश, इंग्रजीतलं भरपूर भांडार जमा केलं होतं. तिच्यासाठी तेच तिचं सम्रुद्ध जीवन. एक मैत्रीण उत्तम कलाकार, सुंदर गायची, शास्त्रीय संगीताची उपासक. मात्र तिने आजवर जितके देश पालथे घातले, तिथले दगड जमा केले. तिच्या हॉलमध्ये ते दगडही तिनं मोठ्या खुबीनं रचून ठेवलेत. दडद असूनही ते तिच्यासाठी 'द'स्टोन्स आहेत. पण सगळ्यात महत्वाची, आणि खऱ्या  अर्थानं जीवन...

ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या

इमेज
  ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या वाचायला जड वाटणारे हे शब्द म्हणजे आयुष्याचं थोडक्यात सार आहेत. जगातील अंतिम सत्य काय आणि मिथ्या म्हणजे खोटं काय, हे या एका ओळीने स्पष्ट केलंय. जगाच्या निर्मितीचा शोध अजूनही लागतोच आहे, कारण जगाच्या निर्मितीला लागलेली लाखो वर्ष ही आपल्या माफक जग निर्मितीची झाली.पण आपल्याच जग किंवा पृथ्वी या संकल्पनेसारख्या असंख्य पृथ्वी, ग्रह, तारे, तारामंडले, इतकंच काय कित्येत लाखो कोट्यावधी आकाशगंगा देखिल अस्तित्वात आहेत. त्यामुळे आपण किती यत्किंचीत प्राणी आहोत याचा यावरूनच अंदाज पुरेसा आहे.  आता हे जे सांगितले ते ब्रह्माच्या व्याप्तिचे अगदीच तोकडे उदाहरण आहे. हे तोकडे का, कारण याचा सारांश अनेक संतांनी आपल्या उक्तींमधून दिलाय, त्यांना प्राप्त होणाऱ्या विश्वाच्या व्यप्तीचा उल्लेख संतांनी श्र्लोक, अभंग यातून सहजी केलेला आहे.  संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ म्हणतात- ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घडी । तो उच्छिष्टें काढी धर्माधरीं ॥१॥ म्हणजे, जो ब्रह्मांडांना उतरंड लावल्याप्रमाणे हवा तसा लावू शकतो, तो मात्र धर्मासाठी, चांगल्यासाठी लोकांची उष्टी काढण्यास लाज बाळगत नाही.. दे...

कविता - मतांचा सडा

इमेज
  पूर्वीच्या राजकारणात होती अदब, होता दरारा आता मात्र नुसताच चोथा, अन् विचारांचा तर बोजवारा   आधीच्या राजकारणात होती एक बैठक अन् विचारधारा आता सगळेच उत्श्रुंखल अन् विचारांचा तर बोजवारा   चावट, डांबरट, मग्रूर की दीडशहाणी कोणतीही बिरुदं 'मिरवतील', तेच खरे राजकारणी   अचार-विचारांबाबत बहुंताश टुकार मर्कट, सरडा, गेंड्यालाही करतील बेजार   भुरटे, पाकिटमार तर काही दरोडेखोर लोकांचेच लुटारू अन् वर शिरजोर   उणीदुणी काढून वेळ मारून नेणार तुम्ही आम्ही यडे, यांनाच मतदान करणार   दिखाव्याला भांडण अन् एकमेकांवर ताशेरे खायची संधी मिळताच, ‘ ऐ, हे सगळे आपलेच रे ’   शहाण्यानं राजकारणात पडू नये म्हणतात म्हणूनच माणसाऐवजी धंदेवाईक जिंकतात   स्वातंत्र्य मिळून झाली, जरी एवढी वर्ष असल्या राजकारण्यांच्या तावडीत राहून आपण मानतोय हर्ष   शहाणे व्हा, सजग व्हा, यांच्या नादी लागू नका (कार्यकर्तेहो..) यांची पोरं शिकतात परदेशात आणि तुम्ही मसणवट्यात किंवा पडक्या वाड्यात   आता खरी वेळ आली, शिकवा यांना धडा स्व...

या गाण्यात आहेत, नारायणाची १० नावं

इमेज
 

कविता कोव्हिडची ... कोरोना #coronapoem

इमेज
 

विठ्ठल विठ्ठल गजरी #अभंग

 अभंग #abhang विठ्ठल विठ्ठल गजरी,अवघी दुमदुमली पंढरी। होतो नामाचा गजर,दिंड्या पताकांचा भार।। निवृत्ती ज्ञानदेव सोपान, अपार वैष्णव हे जाण। हरी कीर्तनासी दाटी, घेती सुखामुखाने मिठी।।

वारी म्हणजे काय? शासकीय पूजा म्हणजे काय?

इमेज
  वारी म्हणजे काय ? #wari #वारीम्हणजेकाय ‘ अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर ’ असं पंढरपुराचं वर्णन करता येईल.. तर काही वारकऱ्यांना संत तुकोबांच्या अभंगातील ।आनंदाचे डोही, आनंद तरंग। आनंदची अंग आनंदाचे।। या ओळींचा अनुभव येत असेल.. तर संत नामदेव म्हणतात त्याप्रमाणे ।जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले, म्हणूनी विठ्ठले कृपा केली।। असा भाव अनेक वारकऱ्यांच्या मनात आहे.. तर संतश्रेष्ठ तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे अनेक वारकऱ्यांचा अनुभव हा असा असतो आमुची मिरास पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥१॥ पांडुरंग आमुचा पिता । रखुमाबाई अमुची माता ॥२॥ भाऊ पुंडलीक मुनि । चंद्रभागा अमुची बहिणी ॥३॥ तुका जुनाट मिरासी । ठाव दिला पायापाशीं ॥४॥ आनंदाचे क्षण म्हणजे वारी, माहेरची आठवण म्हणजे वारी, संताचा सहवास म्हणजे वारी, अन् मायेची ऊब म्हणजे वारी... वारीचं असं कितीही वर्णन केलं तरी अपुरंच...       वारीची परंपरा मजल दरमजल करत जी पायवाट फक्त आणि फक्त विठ्ठल आणि संतांच्या नामाने चालली जाते ती पायवाट म्हणजेच वारी.. वारीची परंपरा तशी हजारो वर्ष जुनी आहे..   तेराव्या शतकात देखिल ह...