जेंव्हा आपण जन्माला येतो
तेंव्हाच नियतीने
आपल्यापुढे आपल्या जेवणाचं ताट
वाढून ठेवलेलं असतं.....
आपण फक्त जेवायचं असतं..
न सांडता.. न भांडता.. त्याला नावं न ठेवता..
माझ्या सासूआई नवदुर्गेची पाचवी माळ 🙏😇 "काही झालं तरी शेक-शेगडी घ्यायचीच प्रज्ञा आणि बाळाला किमान वर्षभर मसाज हवा, तूपण ६ महिने घ्यायला हवा, पुढचं तुम्ही ठरवा." बाळंतपणानंतरचे हे शब्द आहेत सासूबाईंचे, गम्मत म्हणजे आई शेजारी उभी. पण तिला मुलं होऊन ३५ वर्ष झाल्याने काहीच आठवत नव्हतं. पण सासूबाईंनी लागलीच त्यांच्या लेकाला कामाला लावलं, इथे कोळसे कुठे मिळतात ते शोधून काढायला सांगितलं. कारण या वास्तूत येऊनच आम्हाला केवळ वर्ष झालेलं, इथलं काहीच माहिती नाही, पण तरी त्यांनीच विचारपूस करून ३ बायकांपैकी एक बाई मसाजसाठीही निश्चित केली. आता तिच आमच्या इमारतीत जन्मलेल्या पाचव्या बाळाच्या मसाजसाठी येतेय.☺ बरं ते कोळसे मोठ्या गॅसवर चांगले तापू द्यायचे आणि मग मोठ्या घमेल्यात घालून आणायचे, बाळाला शेक द्यायचा व मीही घ्यायचा हा रोजचा शिरस्ता. यामुळे गॅसबिलानं पार २०००चा टप्पा ओलांडला पण त्याची फिकिर त्यांनी मुळीच केली नाही. आणि घरी केलेले डिंकाचे लाडू, मी तर खायचेच पण घरी सगळेच खायचे. कोणाला काय म्हणायचं हे आपल्यासमाजाने आधीच ठरवून ठेवलेलं आहे. आणि ९९टक्के ठिकाणी ते अगदी रास्त आहे. पण जिथे म...
माझी आई नवदुर्गेची चौथी माळ 🙏😇 "प्रज्ञा जरा खोब्र खोऊन दे गं", असं म्हणून तिने माझ्या हाती काम सोपवलं. ते काम छोटंच होतं पण माझ्या छोट्याशा हातांना करवंट्या चांगल्याच टोचत होत्या पण तरी एखादं काम दिलं की ते नेटानं करायचं ही बहुदा आम्हा मेषवाल्यांची सवयच. आई असूनही तिने माझ्यात व भावात कधी भेदभाव केला नाही. दोघांना सर्व काही समान! भले माझी बुद्धी भावाच्या तुलनेत ना के बराबर😅 पणतरीही संधी समान दिल्या जात. पुण्या जवळच्या केडगावचा जन्म, लहानपणी बऱ्याच आजारातून ती बरी झालेली. पण कष्ट वाट्याला अफाट.. एकदा तिच्या आईला अचानक चक्कर आली आणि विहिरीतून दोन हंडे घेऊन चढतअसताना ती पाहिऱ्यांवर बसली, कळशी-हंडा विहिरीत पडले आणि आजी वाचली. तेंव्हापासून आईच्याच वयाचा भाचा जगदीश व आई व धाकटा भाऊ सुभाष असे सगळेच मिळून कावडीनेपाणी भरत असत. लागेल ती मदतताईला म्हणजेच आईला करणे हा छंदच जडला जणू. त्यानंतर शिक्षणासाठी इतर भावंडांसोबत ११वीत पुण्यात आली. पण शिक्षणाचे तीनतेराच वाजले. पण शिक्षण घेण्यासाठी अर्धवेळ काम करत शिकण्याचा प्रयत्नही केला, पण भाचा पायावर पडला आणि पायमोडला, आणि शिक्षणाला खो बसल...
मी कधीच 'अ' तुकडीत न्हवते, आणि त्याचा मला सार्थ अभिमानही आहे..!! पहिली ते चवथी 'म.के. अठवले' शाळेत मी 'क' तुकडीत आणि नंतर सिटी हायस्कूलमध्ये गेल्यावर मला 'ड' :P तुकडी मिळाली होती. अर्थात मार्कांवर आधारित फक्त एकच तुकडी होती आणि ती फक्त चवथीच्या मार्कांवर आधारित होती त्यामुळे साले 'अ' ला जे चिकटले ते चिकटलेच लेकाचे.. अर्थात मला त्यांचा हेवा वगैरे कधीच वाटायचा नाही, उलट त्या वर्गातल्या ढ मुलांचीच फार कीव यायची.. कारण अ तुकडीला शिकवणारे सर्वच 'मास्तर' हि मुलं हुशारच आहेत असा (आ)ग्रह ठेवून शिकवत असत. असो. त्यांचं दुःख त्यांच्यापाशी.. त्यातच एकाच वर्षासाठी मला पुण्यातल्या शाळेत जायला मिळालं ती म्हणजे 'रेणुका स्वरुप'.. ती शाळा मला खरंचच खूप आवडली.. फक्त गाणं की खेळ या माझ्या कन्फ्युजनला घाणेकर बाईंनी फुल स्टॉप देत भरड्या आवाजात सांगितलं.. " काही खेळाबिळात जाऊ नको तुझा आवाज चांगलाय इकडेच येत जा प्रॅक्टिसला.." तेंव्हा मी बऱ्यापैकी गुणी म्हणजे थोडक्यात नंदिबैल असल्यानं मला नेमकं काय आवडतं हे कळलंच नाही.. अर्थात हे मी ११वीत जाईपर्...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा