राजे मोठा प्रमाद घडला.. जमलं तर माफ करा
महाराज.. महाराज..
मालवण मध्ये मोठ्या दिमाखात तुमचा पूर्णाकृती पुतळा उभा केला. स्वतः पंतप्रधान आले, नाविक दलाने संचालन केले. कित्ती कित्ती तो देखणा सोहळा केला. तुमच्या सिंधुदुर्ग किल्ल्याकडे पाहात उभा असलेला तुमचा पुतळा अनेकांचे लक्ष वेधत होता. मलवणातल्या नाविक दलाने म्हणे सगळ्या परवानग्या अशा फटा फट मिळवल्या होत्या. आमच्या राज्य सरकारनेही कोणती कसूर ठेवली न्हवती. कसं अगदी एखाद्या दिवा स्वप्नं प्रमाणे झर झर् घडत गेलं.. ना कुठला अडथळा ना कुणाची आडकाठी.. आता तुमचाच पुतळा म्हंटल्यावर त्याला विरोध तरी कोण करणार? कुणाची असेल बिशाद की असा पुतळा उभारणीला विरोध करेल?
पाहता पाहता तुमची मूर्ती बनली काही महिन्यातच.. आणि चबुतरा बांधला.. पंतप्रधान यांची मलवणात यायची तारीख ठरली अन् लगबग आणखीनच वाढली.. बघता बघता पुतळा तयार झाला. फारसा तुमच्या सारखा वाटत नव्हता म्हणे तो, काहीतरी वेगळा वाटतोय असं अनेकांनी बरेचदा सांगितलं म्हणे, पण उपयोग काय? पुतळा विराजमान झाला होता..
एका बाजूने आरबी समुद्रातून येणाऱ्या फेसाळत्या लाटा आणि तेवढ्याच वेगाने वाहणारे खारे वारे, बाजूने माडाची डोलणारी झाडं, समुद्राच्या पाण्यात शेकडो वर्ष उभा असलेला तुम्ही उत्तम स्थापत्य शास्त्रातील तज्ञाकडून उभा केलेला किल्ला.. अक्षरशः मन थक्क व्हावं आणि उर भरून यावं असा हा सारा देखणा परिसर.. पण काय उपयोग? या साऱ्याला जणू दृष्ट लागली, केवळ ८ महिन्यात पुतळ्याच्या निकृष्ट बांधकामाची पोलखोल झाली, आणि जे घडू नये ते घडलं..
आता यावर समित्या येतील काम पाहतील, नव्याने पुतळ्या साठी खटाटोप सुरू झालाय देखील.. पण काय उपयोग? बूँद से जो गई..
राजकीय अभिनिवेश काहीही असो.. पण महाराज अक्षम्य गुन्हा घडलाय, तुम्हीच आता मोठ्या मनाने महाराष्ट्रातल्या जनतेला माफ करा.. पण केवळ माफ करू नका, सद्बुद्धी, समाजाची सेवा आणि सद्वृत्ती ठेवण्याची तरी किमान बुद्धी द्या..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा